​अलिशान बंगला सोडून 2-bhk मध्ये शिफ्ट झाला हर्षवर्धन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2016 20:29 IST2016-08-02T14:59:53+5:302016-08-02T20:29:53+5:30

‘मिर्झिया’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा हर्षवर्धन कपूर आपल्या कामाप्रति अतिशय डेडिकेटेड अभिनेता आहे. होय, ‘मिर्झिया’साठी हर्षवर्धनने तब्बल दोन ...

Harshavardhana shifted from Amjishn Bungalow to 2-bhk | ​अलिशान बंगला सोडून 2-bhk मध्ये शिफ्ट झाला हर्षवर्धन!

​अलिशान बंगला सोडून 2-bhk मध्ये शिफ्ट झाला हर्षवर्धन!

िर्झिया’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा हर्षवर्धन कपूर आपल्या कामाप्रति अतिशय डेडिकेटेड अभिनेता आहे. होय, ‘मिर्झिया’साठी हर्षवर्धनने तब्बल दोन वर्षे घोडेस्वारी आणि तीरंदाजीचे प्रशिक्षण घेतले. ‘मिर्झिया’च्या ट्रेलरमध्ये हर्षवर्धनने घेतलेली ही मेहनत स्पष्टपणे दिसली. आता हर्षवर्धन ‘भावेश जोशी’ या दुसºया चित्रपटासाठी सज्ज झाला आहे आणि विशेष म्हणजे या चित्रपटासाठीही हर्षवर्धन तितकीच मेहनत घेतोय. होय, या चित्रपटासाठी हर्षवर्धन जुहूतील आपला अलिशान बंगला सोडून वर्सोवा येथील एका टू बेडरूम अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाला आहे. या अपार्टमेंटमध्ये तो त्याचा को-स्टार प्रियांशू पैन्यूलीसोबत राहतो आहे. मर्यादीत सुखसुविधांमध्ये राहून  हर्षवर्धन ‘भावेश जोशी’मधील आपल्या भूमिकेची तयारी करीत आहे. आपल्या कामाप्रति हर्ष किती गंभीर आहे, हे यावरून तुम्हाला कळून चुकले असेलच!

Web Title: Harshavardhana shifted from Amjishn Bungalow to 2-bhk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.