VIDEO: हार्दिक पांड्याने 'लेडी लव्ह'ची अमिताभ बच्चन यांच्याशी करून दिली ओळख, बिग बींनी दिली 'अशी' प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 10:10 IST2026-01-07T10:09:20+5:302026-01-07T10:10:50+5:30
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. ज्यामध्ये हार्दिक पांड्या महिका शर्माला अमिताभ बच्चन यांच्याशी भेट घालून देताना दिसत आहे.

VIDEO: हार्दिक पांड्याने 'लेडी लव्ह'ची अमिताभ बच्चन यांच्याशी करून दिली ओळख, बिग बींनी दिली 'अशी' प्रतिक्रिया
Hardik Pandya Mahieka Sharma Met Amitabh Bachchan: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पांड्याचे नाव बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल माहिका शर्माशी जोडले जात आहे. ते दोघेही अनेकदा एकमेकांसोबत दिसतात. हार्दिकने तिच्यासोबतचे आपले नाते लपवून ठेवलेले नाही. उघडपणे तो तिच्या नावाचा उल्लेख करत असतो. रिलायन्स फाउंडेशनने काल रात्री मुंबईत आयोजित केलेल्या "United In Triumph" या दिमाखदार सोहळ्यातही तो माहिका शर्मासोबत पोहचला होता. यावेळी त्यानं आपल्या 'लेडी लव्ह'ची बिग बी अमिताभ बच्चन यांच्याशी ओळख करून दिली.
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. ज्यामध्ये हार्दिक पांड्या महिका शर्माला अमिताभ बच्चन यांच्याशी भेट घालून देताना दिसत आहे. बिग बींनी हार्दिकला प्रेमाने मिठी मारली आणि त्यानंतर हार्दिकने त्यांना माहिकाची ओळख करून दिली. यावेळी अमिताभ बच्चन यांनी हसून महिकाचे स्वागत केले आणि हार्दिककडे बोट दाखवत काहीतरी मिश्किल टिप्पणी केली, ज्यावर तिघेही मनसोक्त हसताना दिसले.
Hardik Pandya introducing his girlfriend mahika Sharma to Amitabh Bachchan at the Reliance Foundation event last night.❤️ pic.twitter.com/yJ8ZyPneCu
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) January 6, 2026
हार्दिक आणि महिका या सोहळ्यात हातात हात घालून पोहोचले होते. त्यांच्या या केमिस्ट्रीने पापाराझी आणि उपस्थितांच्या नजरा खिळवून ठेवल्या. नताशापासून घटस्फोट घेतल्यानंतर हार्दिक आता माहिकासोबत नवीन आयुष्याची सुरुवात करत असल्याचे दिसून येतंय. हार्दिकने २०२० मध्ये नताशाशी लग्न केले होते, त्यांना अगस्त्य नावाचा मुलगा आहे. २०२४ मध्ये या दोघांनी अधिकृतपणे घटस्फोटाची घोषणा केली होती.