कंगणाचे 'कडक' उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 07:27 IST2016-01-16T01:18:46+5:302016-02-07T07:27:30+5:30

कंगणा राणावत दिग्दर्शक केतन मेहता यांच्या 'राणी लक्ष्मीबाई' च्या जीवनावरील चित्रपटाविषयी फार उत्सुक आहे. यात ती राणी लक्ष्मीबाईची भूमिका ...

The 'hard' answer of the bracelet | कंगणाचे 'कडक' उत्तर

कंगणाचे 'कडक' उत्तर

गणा राणावत दिग्दर्शक केतन मेहता यांच्या 'राणी लक्ष्मीबाई' च्या जीवनावरील चित्रपटाविषयी फार उत्सुक आहे. यात ती राणी लक्ष्मीबाईची भूमिका करणार आहे. मात्र, हा चित्रपट होणार नाही अशी अफवा पसरली आहे. त्यामुळे 'वीमेन इन द वर्ल्ड समेट' साठी लंडन येथे गेलेली कंगणा ही बातमी ऐकून परेशान झाली. तिने ताबडतोब याविषयी सफाई दिली. तिने केतन मेहता यांना कॉल केला आणि खरी परिस्थिती जाणून घेतली. त्यानंतर ती म्हणाली,' हा असा चित्रपट आहे, ज्यात प्री-प्रोडक्शन साठी कमीत कमी एक वर्ष तरी लागणार आहे. चित्रपटाची संपूर्ण टीम खुपच उत्साहित आहे. अशा बातमीमुळे टेन्शन येणे स्वाभाविक आहे. पण, अशा खोट्या अफवा पसरवल्या जातात. चित्रपटांचे नुकसान करण्यासाठी अशा बातम्या देतात. यात काही तथ्य नसते.'

Web Title: The 'hard' answer of the bracelet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.