5 दिवस चालणार हरभजन-गीताचा विवाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2016 05:04 IST2016-01-16T01:20:24+5:302016-02-08T05:04:11+5:30

बॉलिवूड अभिनेत्री गीता बसरा आणि भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज हरभजन सिंग 1 नोव्हेंबरला दिल्ली येथे लग्नाचे रिसेप्शन देणार ...

Harbhajan-Geetha wedding for 5 days | 5 दिवस चालणार हरभजन-गीताचा विवाह

5 दिवस चालणार हरभजन-गीताचा विवाह


/>बॉलिवूड अभिनेत्री गीता बसरा आणि भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज हरभजन सिंग 1 नोव्हेंबरला दिल्ली येथे लग्नाचे रिसेप्शन देणार आहेत. भारतीय क्रिकेट संघ या रिसेप्शनला हजर राहणार आहे. हरभजन सिंग आणि गीता बसरा यांचे लग्न पंजाबी पध्दतीने 5 दिवस धुमधडाक्यात होणार आहे.
हरभजन व गीताच्या लग्नाचा कोणताही विधी मुंबईत होणार नसल्याचे समजते. मूळची लंडनची असणार्‍या गीताचे वास्तव्य सध्या मुंबईत आहे. तिने मुंबईतील एका डिझायनरवर सर्व खरेदीची जबाबदारी सोपवली आहे. तिच्या परिवारातील सर्व सदस्य लवकरच लंडनहून मुंबईला येणार आहेत. पाच दिवस चालणार्‍या या विवाह समारंभात चुडा समारंभ, संगीत असे पारंपरिक पंजाबी विधी पार पाडले जातील. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हा विवाह सोहळा पार पडेल.
भारतीय क्रिकेट संघ या काळात कसोटी मालिका खेळणार असून 25 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान सामना नाही. त्यामुळे 1 नोव्हेंबरला संपूर्ण टीम लग्न समारंभात हजर राहू शकते.

Web Title: Harbhajan-Geetha wedding for 5 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.