अक्षय करतोय दिवाळीची खास प्लॅनिंग!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2016 21:19 IST2016-10-22T21:19:58+5:302016-10-22T21:19:58+5:30
अक्षय कुमार आपल्या कुटुंबाला प्राधान्य देतो हे त्याच्या चाहत्यांना चांगलेच ठाऊक आहे. पत्नी ट्विंकलसाठी तो काहीही करायला तयार असतोच. ...
.jpg)
अक्षय करतोय दिवाळीची खास प्लॅनिंग!
अक्षय आपल्या कुटुंबासोबत एन्जॉय करण्याची संधी सोडत नाही. यामुळे त्याने आपला वाढदिवस आपल्या कुटुंबासोबत मालदिवला साजारा केला होता. आता तर दिवाळीच असल्याचे त्याने आपल्या सर्व कामातून ब्रेक घेत दिवाळी साजरी करण्याचा बेत आखला आहे. सध्या तो ‘नाम शबाना’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. हा चित्रपट ‘बेबी’चा प्रिक्वल असल्याचे सांगण्यात येते. यात तो तापसी पन्नूसोबत दिसणार आहे. नुकतीच त्याने सुभाष कपूरच्या ‘जॉली एलएलबी 2’ची शूटिंग पूर्ण केली होती. यासाठी त्याने आपल्या संपूर्ण टीमला श्रेय दिले होते.
आगामी वर्षभर तो बिझी असणार आहे. ‘नाम शबाना’ची शूटिंग पूर्ण केल्यावर नीरज पांडे यांच्या ‘क्रॅक’ व ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात तो व्यस्त होणार आहे. शिवाय नुकतेच त्याने ‘गोल्ड’ या चित्रपटाचे पोस्टर लाँच केल्याने तो यातही व्यस्त होईल. क्रॅक 15 आॅगस्ट 2017 ला तर गोल्ड 15 आॅगस्ट 2018 ला रिलीज होणार असल्याचे सांगण्यात येते.
काही दिवसांपूर्वी जॅकलिनसोबत काम न करण्याचा निर्णय अक्षयने घेतला होता. यामागे ट्विंकलने टाकलेला दबाव हे कारण असल्याचे सांगण्यात आले होते. आता तो आपल्या बायकोला खूश करण्यासाठी काहीतरी बेत आखतो आहे हे नक्की. पण यामागे आणखी एक कारण आहे ते म्हणजे, यावर्षांत अक्षयचे तीन चित्रपट सुपरहिट ठरले आहेत.