Birthday Special : अक्षय कुमार ते शाहिद कपूर हे आहेत प्रियंकाचे गाजलेले लव्ह अफेअर्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 11:15 AM2018-07-18T11:15:43+5:302018-07-18T11:16:18+5:30

प्रियंकाच्या या प्रवासात तिच्या कामासोबतच तिचे अफेअर्सही खूप गाजले. सध्या जरी तिचं अफेअर निक जोनससोबत सुरु असलं तरी याआघी अनेक कलाकारांसोबत तिचं नाव जोडलं गेलं. चला जाणून घेऊ तिचे अफेअर्स....

Happy Birthday Priyanka Chopra : 5 love affairs of bollywood desi girl Priyanka | Birthday Special : अक्षय कुमार ते शाहिद कपूर हे आहेत प्रियंकाचे गाजलेले लव्ह अफेअर्स!

Birthday Special : अक्षय कुमार ते शाहिद कपूर हे आहेत प्रियंकाचे गाजलेले लव्ह अफेअर्स!

googlenewsNext

बॉलिवूडची देली गर्ल प्रियंका चोप्रा आज तिचा ३६वा वाढदिवस साजरा करत आहे. सध्या ती बॉलिवूडपेक्षा हॉलिवूडमध्ये रमत आहे. तिचा बॉलिवूडचा प्रवास सर्वांनाच थक्क करणारा आहे. प्रियंकाच्या या प्रवासात तिच्या कामासोबतच तिचे अफेअर्सही खूप गाजले. सध्या जरी तिचं अफेअर निक जोनससोबत सुरु असलं तरी याआघी अनेक कलाकारांसोबत तिचं नाव जोडलं गेलं. चला जाणून घेऊ तिचे अफेअर्स....

बॉलिवूडची देसीगर्ल प्रियंका चोप्रा ही आता अमेरिकन गायक निक जोनससोबत रिलेशनशिपमध्ये आहे. पण सिनेमात आल्यावर तिचे अनेक अफेअर्स गाजले. पण सिनेमात येण्याआधी अभिनेता असीनसोबत रिलेशनशिपमध्ये होती. इतकेच काय तर असीनपासून पिच्छा सोडवण्यासाठी तिला नोटीसही पाठवावी लागली होती.

बॉलिवूडमध्ये एन्ट्री केल्यानंतर प्रियंकाचं सर्वात जास्त गाजलेलं अफेअर म्हणजे अभिनेता अक्षय कुमारसोबतचं. 'अंदाज', 'मुझेसे शादी करोगी', 'ऐतराज' या सिनेमांमध्ये एकत्र काम केल्यानंतर प्रियंकाचं नाव अक्षय कुमारसोबत जोडलं गेलं. पण आपल्या नात्याबाबत दोघांनी कधीही काही जाहीर खुलासा केला नाही. अशीही चर्चा होती की, ट्विंकल खन्नाने प्रियंकाला अक्षयपासून दूर राहण्यास सांगितले होते. त्यानंतर अक्षयने प्रियंकासोबत सिनेमात करणे सोडले. 

देसी गर्ल प्रियंका चोप्राचं नाव बॉलिवूडचा किंग शाहरूख खानसोबतही जोडलं गेलं होतं. 'डॉन' या सिनेमात दोघांनी एकत्र काम केलं होतं. यावेळी दोघे फार जवळ आले होते. पण दोघांच्या वाढलेल्या जवळीकीमुळे गौरी खान नाराज झाली होती. त्यामुळे शाहरुखने प्रियंकापासून दूर राहणे सुरु केले. 

प्रियंका आणि अभिनेता शाहीद कपूर यांचं अफेअर चांगलंच गाजलं. दोघांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं. त्यांनी बरीच वर्ष एकमेकांना डेट केलं पण त्यांनंतर दोघे वेगळे झाले. 

लव्हस्टोरी 2050 आणि  What's Your Raashee सारख्या सिनेमांमध्ये प्रियंका हरमन बावेजासोबत दिसली होती. पण हरमनच्या बुडत्या करिअरमुळे दोघे वेगळे झाल्याचे बोलले जाते. 

सध्या प्रियंका निक जोनस याला डेट करत असून दोघे लवकरच लग्न करणार असल्याचीही चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वीच निक प्रियंकाच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी भारतात आला होता. सध्या दोघे एकमेकांना जाणून घेत आहेत.

Web Title: Happy Birthday Priyanka Chopra : 5 love affairs of bollywood desi girl Priyanka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.