Happy Birthday Manish Malhotra : मनीषच्या बर्थ पार्टीत काय ठरले आकर्षणाचे केंद्र?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2016 14:12 IST2016-12-05T14:12:11+5:302016-12-05T14:12:11+5:30
बॉलिवूडच्या तमाम बड्या स्टार्ससाठी ड्रेस डिझाईन करणारा फॅशन डिझाईनर मनीष मल्होत्रा याचा आज (५ डिसेंबर) वाढदिवस. काल रात्री या ...

Happy Birthday Manish Malhotra : मनीषच्या बर्थ पार्टीत काय ठरले आकर्षणाचे केंद्र?
ब लिवूडच्या तमाम बड्या स्टार्ससाठी ड्रेस डिझाईन करणारा फॅशन डिझाईनर मनीष मल्होत्रा याचा आज (५ डिसेंबर) वाढदिवस. काल रात्री या वाढदिवसाची पार्टी धम्माल रंगली. रात्री उशीरापर्यंत चाललेल्या या पार्टीत बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांनी हजेरी लावली.
ब्लॅक कुर्ता आणि व्हाईट चूडीदार अशा वेषात बर्थ डे बॉय मनीष या पार्टीत पोहोचला आणि त्याच्यावर शुभेच्छांचा एकच वर्षाव झाला. या पार्टीतील सर्वांत मोठे आकर्षण ठरले तो म्हणजे चॉकलेट केक़ होय, मनीषच्या ५० व्या वाढदिवशी खास ५० किलोंचा चॉकलेट मागवण्यात आला होता. या केकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
![]()
हा केक पार्टीतील उपस्थितांसह बाहेर उभ्या मीडियामध्येही वाटण्यात आला. श्रीदेवी, बोनी कपूर, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय, रवीना टंडन, करिश्मा कपूर, सोफी चौधरी अशा अनेकांनी मनीषला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पार्टीला हजेरी लावली.
![]()
![]()
टॉप फॅशन डिझाईनरमध्ये आजघडीला मनीषची गणना होते. मनीषने अतिशय मेहनतीने इथपर्यंतचा टप्पा गाठला. फॅशन डिझाईनर म्हणून नावारूपास येण्याआधी मनीष केवळ ५०० रुपए महिन्याची नोकरी करायचा. आजघडीला तो फॅशन विश्वातील एका ब्रँड आहे. मनीष लहापणी आपल्या आईला मेकअप, लिपस्टिक शेड आणि साड्यांबद्दल सल्ले द्यायचा. त्याचा इंटरेस्ट त्याने फार कमी वयात ओळखला होता. अभ्यासात मनीषला फार गती नव्हती. मात्र स्केचिंग, पेन्टिंगमध्ये त्याला प्रचंड रूची होती. सर्वात आधी मनीषने एका बुटीकमध्ये नोकरी केली. याठिकाणी त्याला महिन्याला ५०० रुपए पगार मिळायचा.
![]()
मनीषने सर्वात पहिला ड्रेस डिझाईन केला तो अभिनेत्री जुही चावला हिच्यासाठी. पण याला फारसा चांगला रिस्पॉन्स मिळाला नाही. मात्र मनीषने हार मानली नाही. अखेर ‘रंगीला’ने मनीषला मोठे यश व नाव मिळवून दिले. फॅशनचे कुठलेही फॉर्मल ट्रेनिंग न घेता, त्याने यशाचा हा टप्पा गाठला.