Happy birthday Esha : जाणून घ्या ईशा गुप्ताबद्दल काही खास गोष्टी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2016 10:55 IST2016-11-28T10:54:18+5:302016-11-28T10:55:15+5:30
मिस इंडिया इंटरनॅशनल आणि अभिनेत्री ईशा गुप्ता हिचा आज (२८ नोव्हेंबर) वाढदिवस. तेव्हा जाणून घ्या ईशा गुप्ताबद्दल काही खास गोष्टी... ...
Happy birthday Esha : जाणून घ्या ईशा गुप्ताबद्दल काही खास गोष्टी...
ईशाच्या वडिलांना खरे तर तिला पायलट बनवायचे होते. कारण ईशाचे वडील हेही स्वत: पायलट आहेत. आईने मात्र ईशाला तिची वाणिज्य शास्त्रातील रूची बघून मॅनेजर बनण्याचा सल्ला दिला होता. पण एकेदिवशी मी माझ्या इच्छेने काय व्हायचे ते ठरवणार, असे ईशाने आम्हाला स्पष्टपणे सांगितले. यानंतर आम्ही आमची मते कधीच ईशावर लादली नाहीत.
- एका ऊन्हाळ्यात भोपाळमध्ये एक शो होता. यात ईशाने हौस म्हणून मॉडेलिंग केली. कारण हा शो तिच्या मित्राने आयोजित केला होता. पण ईशा या शोची विनर ठरली. यानंतर ईशाने स्वत:चा पोर्टफोलिओ बनवला.
- बॉलिवूडमध्ये पर्दापण करण्याआधी ईशा मिस इंडिया इंटरनॅशनल राहिली. हा किताब जिंकल्यानंतर ईशाला आपोआप बॉलिवूड व मॉडेलिंगच्या आॅफर्स यायला लागल्या.
- ईशा वर्णाने काहीशी सावळी आणि तिची बहीण नेहा गोरी. यामुळे घरात ईशाला काहीशी दुय्यम वागणूक मिळायची. खुद्द ईशानेच एका मुलाखतीत ही गोष्ट सांगितली होती. माझी बहीण गोरी आणि मी सावळी. त्यामुळे अनेकदा माझ्यापेक्षा तिला महत्त्व दिले जायचे. यामुळेच मी कधीही रंग उजळण्याचा दावा करणाºया क्रिमच्या जाहिराती करत नाही.
- पण एकवेळ अशी आली, जेव्हा ईशाजवळ मुंबईतील घराचे भाडे चुकवण्यासाठी २० हजारही नव्हते. ‘जन्नत2’मधून ईशाने बॉलिवूड डेब्यू केले. यानंतर ‘राज3डी’,‘हमशक्ल’ आणि ‘बेबी’ या चित्रपटांत ती दिसली. अलीकडे ‘रूस्तम’मध्ये ती दिसली.