·Happy Birthday Ekta: तर काय एकता कपूरला मिळाला तिचा परफेक्ट पार्टनर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2018 10:04 IST2018-06-07T04:34:09+5:302018-06-07T10:04:09+5:30

घराघरात सासू-सूनांच्या मालिका पोहोचवणा-या ‘बालाजी टेलिफिल्म’ची सर्वेसर्वा आणि अभिनेता जितेन्द्र यांची मुलगी एकता कपूर हिचा आज (७ जून) वाढदिवस.  ...

Happy Birthday Ekta: So Ekta Kapoor got her perfect partner? | ·Happy Birthday Ekta: तर काय एकता कपूरला मिळाला तिचा परफेक्ट पार्टनर?

·Happy Birthday Ekta: तर काय एकता कपूरला मिळाला तिचा परफेक्ट पार्टनर?

ाघरात सासू-सूनांच्या मालिका पोहोचवणा-या ‘बालाजी टेलिफिल्म’ची सर्वेसर्वा आणि अभिनेता जितेन्द्र यांची मुलगी एकता कपूर हिचा आज (७ जून) वाढदिवस.  एकताला टीव्ही इंडस्ट्रीची ‘क्वीन’ म्हणून ओळखले जाते. १९९५ मध्ये टीव्ही आलेल्या ‘हम पांच’ या मालिकेने लोकप्रीयतेचा कळस गाळला. महिला गँगची ही मालिका लोकांना प्रचंड आवडली. या मालिकेची कल्पना एकताची होती. एकता व तिची आई शोभा कपूर यांनी साकारलेल्या बालाजी टेलिफिल्मने ही मालिका प्रोड्यूस केली आणि यानंतर एकताने कधीच मागे वळून पाहिले नाही. आज एकता ४३ वर्षांची आहे आणि आजपर्यंत तिने ४० पेक्षा अधिक मालिका व चित्रपट प्रोड्यूस केले आहेत. तिच्या नावावर २० पेक्षा अधिक हिट मालिका आहेत. पण ‘हम पांच’, ‘क्यों की सांस भी कभी बहू थी’, ‘कसौटी जिंदगी की’,‘कहानी घर घर की’ आणि ‘नागीन’ या पाच मालिकांनी एकताला ‘टीव्हीची क्वीन’ बनवले.
चाळीशी ओलांडूनही एकता अद्यापही अविवाहित आहे. पण कदाचित आता तिला आपला परफेक्ट पार्टनर मिळाला आहे. हे आम्ही नाही तर एकताचे सोशल अकाऊंट सांगतेय. होय, एकताने तिच्या सोशल अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोवरून एकताला ज्या व्यक्तीचा शोध होता, ती व्यक्ति तिला मिळाल्याचे मानले जात आहे. एकताने आपल्या सोशल अकाऊंटवर एका कपलचा फोटो पोस्ट केला आहे आणि या फोटोला तिने दिलेले कॅप्शन बरेच काही सांगणारे आहे.



‘काही गोष्टी उशीरा मिळतात ख-या पण प्रतीक्षा करणे नेहमीच फायदेशीर असते़...’ असे एकताने या फोटोच्या कॅप्शनदाखल लिहिले आहे. एकताची ही पोस्ट बघता, कदाचित तिची प्रतीक्षा फळास आली, म्हणजेच परफेक्ट पार्टनरचा तिचा शोध संपला, असे मानले जात आहे. अर्थात अद्याप एकता थेटपणे यावर काहीही बोललेली नाही.

ALSO READ : ‘ये है मोहब्बतें’ बंद करण्याची मागणी करणा-यांना एकता कपूरने असे दिले उत्तर!!

यापूर्वी एका मुलाखतीत एकता तिच्या लग्नाबद्दल बोलली होती. माझ्या घरचे माझ्या लग्नाच्या मागे लागले आहेत. पण मी लग्नासाठी अद्याप तयार नाही. माझे अनेक मित्र ज्यांनी लग्न केले होते, ते आता सिंगल झाले आहेत. प्रतीक्षा यादी बरीच मोठी आहे. मी सुद्धा या यादीत आहे, असे ती म्हणाली होती. मला मुल तर हवे पण लग्नाबद्दल मी काहीही सांगू शकत नाही, असेही तिने स्पष्ट केले होते.

Web Title: Happy Birthday Ekta: So Ekta Kapoor got her perfect partner?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.