अक्षयकुमारने पत्नी ट्विंकल खन्नाला अशा अंदाजात दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2017 09:27 AM2017-12-29T09:27:44+5:302017-12-29T16:03:18+5:30

अक्षयकुमारची पत्नी ट्विंकल खन्ना तिचा ४३वा वाढदिवस साजरा करीत असून, पती अक्षयकडून त्यास स्पेशल बनविण्याचा प्रयत्न केला जात आहे. वाचा सविस्तर!

Happy Birthday to Akshay Kumar, wife, Twinkle Khanna! | अक्षयकुमारने पत्नी ट्विंकल खन्नाला अशा अंदाजात दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

अक्षयकुमारने पत्नी ट्विंकल खन्नाला अशा अंदाजात दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

googlenewsNext
िनेत्री, निर्माता अन् लेखिका ट्विंकल खन्ना आज तिचा ४३वा वाढदिवस साजरा करीत आहे. अभिनयातून आपली जादू दाखविल्यानंतर लेखणीतून परखड मत मांडणारी ट्विंकल साउथ आफ्रिकेतील केपटाउन शहरात सध्या आपल्या फॅमिलीसोबत सुट्या एन्जॉय करीत आहे. न्यू इअर अन् बर्थ डे सेलिब्रेशन असा दुहेरी योग आला असल्याने ट्विंकलसह तिचा पती अक्षयदेखील तिचा हा वाढदिवस स्पेशल करण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत आहे. त्यासाठी अक्षयने ट्विंकलच्या बर्थ डेनिमित्त इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला असून, फोटोत तो कार ड्राइव्ह करताना दिसत आहे. हा फोटो शेअर करताना अक्षयने एक स्वीट मॅसेजही त्याच्या चाहत्यांशी शेअर केला आहे. फोटो बघून हे स्पष्ट होते की, अक्षय पत्नीसोबत आफ्रिकन पोर्ट सिटीमध्ये कार ड्राइव्ह करीत आहे. याव्यतिरिक्त ट्विंकलनेही वडील राजेश खन्ना यांच्या वाढदिवसाची आठवण ताजी करताना एक ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट फोटो पोस्ट केला आहे.  
 

अक्षयने फोटो पोस्ट करताना शेअर केलेल्या मॅसेजमध्ये लिहिले की, ‘प्रत्येक प्रवास अ‍ॅडव्हँचर आणि मनोरंजनाने भरपूर असतो, जेव्हा माझा आवडता जोडीदार माझ्यासोबत असतो. माय लाइफ ! हॅप्पी बर्थडे, टिना.’ अक्षयकुमार आणि ट्विंकल खन्नाचे लग्न २००१ मध्ये झाले असून, हे दाम्पत्य त्यांच्या आयुष्यात खूश आहेत. या दाम्पत्याला दोन मुले असून, मुलाचे नाव आरव, तर मुलीचे नाव नितारा आहे. अक्षय आपल्या परिवाराची खूप काळजी घेतो. शिवाय आपल्या पत्नीवर तो प्रचंड प्रेम करतो. काही दिवसांपूर्वीच त्याने त्याच्या खांद्यावर पत्नीचे नीकनेम असलेला टॅटू गोंदला. ‘टिना’ नावाचा हा टॅटू दिसत असलेला एक फोटो शेअर करून त्यानेच ही माहिती त्याच्या चाहत्यांसोबत शेअर केली, तर पाठीवर त्याने मुलगा आरवचे नाव असलेला एक टॅटू गोंदलेला आहे. 
 

ट्विंकल खन्नाने बॉलिवूडमध्ये १९९५ मध्ये आलेल्या ‘बरसात’ या चित्रपटातून डेब्यूू केला. त्यानंतर ‘बादशाह, मेला आणि जब प्यार किसी से होता है’ यांसारख्या चित्रपटात त्याने काम केले. पुढे तिने तिच्या अ‍ॅक्टिंग करिअरला गुडबाय करताना इंटिरियर डिझायनर या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर स्तंभलेखक म्हणूनही स्वत:ची ओळख निर्माण केली. आता ट्विंकल पुन्हा एका नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. होय, अक्षयच्या आगामी ‘पॅडमॅन’ या चित्रपटाच्या माध्यमातून तिने निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. 

Web Title: Happy Birthday to Akshay Kumar, wife, Twinkle Khanna!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.