रणवीर सिंगने रणबीर कपूरचे नाव घेताच, आलिया भटने दिली अशी Reaction
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2019 16:29 IST2019-01-10T16:05:19+5:302019-01-10T16:29:10+5:30
सध्या आलिया भट आणि रणबीर कपूरच्या अफेअरची चर्चा सध्या सगळीकडे आहे. आलिया रणबीर कपूरच्या फॅमिलीसोबत अनेकवेळा फिरताना, डिनर करताना दिसते

रणवीर सिंगने रणबीर कपूरचे नाव घेताच, आलिया भटने दिली अशी Reaction
सध्या आलिया भट आणि रणबीर कपूरच्या अफेअरची चर्चा सध्या सगळीकडे आहे. आलिया रणबीर कपूरच्या फॅमिलीसोबत अनेकवेळा फिरताना, डिनर करताना दिसते. आलिया रणबीर कपूरसोबत 'ब्रह्मास्त्र'मध्ये दिसणार आहे तर रणवीर सिंग 'गली बॉय'मध्ये दिसणार आहे. नुकताच गली बॉयचा ट्रेलर लाँच झाला. यावेळी आलियाला रणबीर आणि रणवीर कपूरसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता आणि दोघांमध्ये काय समानता आहे याबाबत प्रश्न विचारण्यात आला.
यावर प्रश्नांची उत्तर देताना आलिया म्हणाली, दोघे ही माणूस म्हणून आणि अभिनेता म्हणून खूप चांगले आहे. दोघे माझ्यासाठी खास आहेत. दोघांमध्ये फरक ऐवढाच आहे की मी एकासोबत 'गली बॉय' करतेय आणि दुसऱ्यासोबत 'ब्रह्मास्त्र'.
आलियाचे बोलून संपतच नाही तोच रणवीर सिंगने बोलायला सुरुवात केली. आलियाची मस्करी करत रणवीर म्हणाला, एक थोडा जास्त स्पेशल आहे आणि एक थोडा कमी स्पेशल आहे. यानंतर आलिया काहीशी लाजली.
‘गली बॉय’मध्ये रणवीर सिंग नावेद शेख नामक युवकाची भूमिका साकारताना दिसणार आहे. ही भूमिका साकारण्यासाठी रणवीरने प्रचंड मेहनत घेतली. हा चित्रपट १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन जोया अख्तरने केले आहे. या चित्रपटासाठी रणवीर रॅपचे प्रशिक्षण घेतले आहे.