गुल पनाग चिंतेत पती अडकला बेल्जियममध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2016 19:34 IST2016-03-23T02:34:51+5:302016-03-22T19:34:51+5:30
बेल्जियमची राजधानी बु्रसेल्स मंगळवारी सकाळी स्फोटांनी हादरली. एकापाठोपाठ एक अशा तीन स्फोटाता २८ लोक ठार व अनेकजण जखमी झाल्याचे ...

गुल पनाग चिंतेत पती अडकला बेल्जियममध्ये
ब ल्जियमची राजधानी बु्रसेल्स मंगळवारी सकाळी स्फोटांनी हादरली. एकापाठोपाठ एक अशा तीन स्फोटाता २८ लोक ठार व अनेकजण जखमी झाल्याचे वृत्त आहे. या वृत्ताने अभिनेत्री गुल पनाग कमालीची चिंतीत आहे. तिचा पती ऋषी अटारी हाही स्फोटानंतर धुमसत असलेल्या बु्रसेल्समध्ये अडकून पडला आहे. गुलचा पती ऋषी जेट एअरवेजमध्ये पायलट आहे. स्फोट झाला तेव्हा तो विमानात होता. ज्वांतेम विमानतळावर त्याचे विमान उभे होते. स्फोटाच्या काही मिनिट आधी त्याचे विमान लँड झाले होते. स्फोटानंतर सर्व प्रवाशी व स्टाफला विमानातच रोखून धरण्यात आले. यानंतर त्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले. गुलने टिष्ट्वटरवरून ही माहिती दिली.
गायक अभिजीतचा मुलगा व पत्नी हे दोघेही बु्रसेल्सच्या विमानतळावर अडकून पडले आहे. अर्थात ते सर्व सुरक्षित आहेत.
गायक अभिजीतचा मुलगा व पत्नी हे दोघेही बु्रसेल्सच्या विमानतळावर अडकून पडले आहे. अर्थात ते सर्व सुरक्षित आहेत.