गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर समीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2016 09:08 IST2016-02-18T16:08:47+5:302016-02-18T09:08:47+5:30

प्रसिद्ध गीतकार समीर अंजान, ज्यांना आपण सर्व केवळ ‘समीर’ नावाने ओळखतो, त्यांनी बॉलिवूडमध्ये सर्वाधिक गाणे लिहिण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड ...

Guinness World Records Holder Sameer | गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर समीर

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर समीर

रसिद्ध गीतकार समीर अंजान, ज्यांना आपण सर्व केवळ ‘समीर’ नावाने ओळखतो, त्यांनी बॉलिवूडमध्ये सर्वाधिक गाणे लिहिण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदवला आहे. १५ डिसेंबर, २०१५ पर्यंत त्यांनी ३५२४ गाणी लिहिलेली आहेत. 

बुधवारी पार पडलेल्या एका शानदार सोहळ्यात त्यांना विक्रमाचे प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. १९८३ साली गीतकार म्हणून हिंदी सिनेसृष्टीत पहिले पाऊल ठेवले होते. ‘बेखबर’ चित्रपटासाठी त्यांनी पहिले गाणे लिहिले. तेव्हापासून ते आजपर्र्यत त्यांनी ६५० हिंदी चित्रपटांची गाणी लिहिलेली आहेत. 

sameer

सहज, सोपे, सर्वांना समजतील, उमजतील अशा शब्दांत अर्थपूर्ण गाणे लिहिण्याच्या हातोटीमुळे अनेक पुरस्कारांना त्यांनी गवसणी घातली आहे. १९९१ सालच्या ‘आशिकी’मधील ‘नजर के सामने’ या गाण्यासाठी त्यांना पहिला फिल्मफेयर अ‍ॅवॉर्ड मिळाला.

विक्रमाची नोंद झाल्यानंतर समीर यांनी म्हटले की, ‘मी किती गाणे लिहिले हे याकडे मी कधीच लक्ष दिले नाही. माझे मित्र बिस्वास नेरुळकर यांनी मला लक्षात आणून दिले की, मी सर्वात जास्त गाणी लिहिलेली आहेत आणि मी गिनिज वर्ल्ड रेकॉडसाठी अर्ज केला पाहिजे.’

sameer

‘बदलत्या काळानुसार मी लिहिण्याची शैली बदलत गेलो. म्हणून तर आज ३५ वर्षांनंतरही मी इंडस्ट्रीमध्ये सक्रीय आहे. शंभरापेक्षा जास्त संगीतकारांसोबत मी काम केले आहे,’ असे ते म्हणाले.

Web Title: Guinness World Records Holder Sameer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.