गुडन्युज ! या चित्रपटात दिसणार अनिल कपूर आणि माधुरी दीक्षितची जोडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2018 10:42 IST2017-11-13T07:37:46+5:302018-01-01T10:42:41+5:30
माधुरी दीक्षित आणि अनिल कपूरची जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर आपली केमिस्ट्री दाखवायला सज्ज आहेत. या दोघांच्या फॅन्ससाठी एक ...

गुडन्युज ! या चित्रपटात दिसणार अनिल कपूर आणि माधुरी दीक्षितची जोडी
म धुरी दीक्षित आणि अनिल कपूरची जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर आपली केमिस्ट्री दाखवायला सज्ज आहेत. या दोघांच्या फॅन्ससाठी एक खूषखबर आहे. जवळपास 17 वर्षानंतर दोघांची जोडी पुन्हा एकदा स्क्रिन शेअर करणार आहे. इंदर कुमार दिग्दर्शित टोटल धमाल याचित्रपटात दोघे एकद झळकणार आहेत. माधुरी आणि अनिल कपूरच्या जोडीने आतापर्यंत खेल, बेटा, तेजाब सारखे सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहे. टोटल धमालमध्ये माधुरी आणि अनिल कपूरसह, अजय देवगण, रितेश देशमुख, अर्शद वारसी यांच्यादेखील प्रमुख भूमिका आहेत. रितेश देशमुख आणि अर्शद वारसीचे नाव या चित्रपटासाठी आधीचे फायनल करण्यात आले होते.
एका इंटव्ह्रु दरम्यान इंदरने सांगितले अनिल कपूर आणि माधुरीची जोडी टोटल धमाल करायला तयार आहेत. जानेवारी महिन्यापासून मुंबईत या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करण्यात येणार आहे. पुढच्या वर्षी दिवाळीत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
ALSO READ : अनिल कपूरला केस विंचरण्यासाठी लागले चक्क ५० तास, मग समोर आला असा लूक!
इंदर कुमार आणि अनिल कपूरच्या जोडीने बॉक्स ऑफिसवर अनेक हिट चित्रपट दिले आहेत. फक्त या जोडीचा शेवटचा चित्रपट रिश्ते बॉक्स ऑफिसवर आपटला होता. आता प्रेक्षकांना टोटल धमाल या चित्रपटला कसा प्रतिसाद देतात हा चित्रपट रिलीज झाल्यावरच कळेल. सध्या अजय देवगणचा गोलमाल अगेन चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवे रेकॉर्ड प्रस्थापित करतो आहे तर अनिल कपूर आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अनिल कपूरसोबतच राजकुमार राव आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत.