आजोबा अमिताभचे आराध्याला स्पेशल गिफ्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 07:24 IST2016-01-16T01:13:45+5:302016-02-07T07:24:43+5:30
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या नातीला खास बर्थ डे गिफ्ट दिले आहे. अभिषेक आणि ऐश्वर्याची मुलगी आराध्याच्या चौथ्या ...

आजोबा अमिताभचे आराध्याला स्पेशल गिफ्ट
ब लिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या नातीला खास बर्थ डे गिफ्ट दिले आहे. अभिषेक आणि ऐश्वर्याची मुलगी आराध्याच्या चौथ्या वाढदिवसानिमित्त बिग बींनी एक स्पेशल कविता लिहिली व त्यांच्या ब्लॉगवर ती शेअर केली. लहान मुलांची निरागसता तरलपणे टिपणारी ही कविता त्यांची काव्यप्रतिभा दर्शविणारी आहे. त्यांचे वडील हरिवंशराय बच्चन महान हिंदी कवी म्हणून ओळखले जातात. आता बिग बींदेखील त्यांच्या पावलावर पाऊल ठेवताना दिसत आहेत. मूळ इंग्रजीत असलेल्या या कवितेमधून बिग बींनी लहान मुलांमधील उत्सुकतेसंबंधी अतिशय छान विचार मांडले आहेत. ते लिहितात, कुतुहल ही अशी गोष्ट आहे ज्यामुळे आपण नवीन वाटा धुंडाळतो. लहान मुलांमध्ये तर कुतुहल ठासूनठासून भरलेले असते. छकुल्या पावलांनी घरभर धावणारी ही मुले मोठी झाल्यावर जगाच्या शोधात निघतात. जे माहीत नाही ते जाणून घेण्याचा त्यांचा आटापिटा आणि खटाटोप सुरू होतो. अशा या लहानग्यांना मोठे होतान पाहून आपल्या बालपणात हरवून जायला होते. काळ कसा झटपट निघून जातो. आपणही एकेकाळी असेच निरागस, नितळ आणि निरामय होतो ही कल्पनाच स्वार्थी मनाला शांत करून जाते.