​गोविंदाने दिली चाहत्यांना वाढदिवसाची भेट ; ‘आ गया हिरो’ फर्स्ट लूक केला शेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2016 18:54 IST2016-12-21T18:13:08+5:302016-12-21T18:54:03+5:30

बॉलिवूडचा राजाबाबू गोविंदा आज आपला ५३ वा वाढदिवस साजरा करीत आहे. त्याच्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच आपल्या चाहत्यांसाठी ...

Govind's birthday gift to his fans; First came the 'come hero' | ​गोविंदाने दिली चाहत्यांना वाढदिवसाची भेट ; ‘आ गया हिरो’ फर्स्ट लूक केला शेअर

​गोविंदाने दिली चाहत्यांना वाढदिवसाची भेट ; ‘आ गया हिरो’ फर्स्ट लूक केला शेअर

ong>बॉलिवूडचा राजाबाबू गोविंदा आज आपला ५३ वा वाढदिवस साजरा करीत आहे. त्याच्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच आपल्या चाहत्यांसाठी आगळी वेगळी भेट दिली आहे. गोविंदाच्या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक त्याने आपल्या वाढदिवसानिमित्त शेअर केला आहे. 

गोविंदाने आपल्या आगामी ‘आ गया हिरो’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक त्याच्या चाहत्यांना भेट म्हणून दिला आहे. मागील काही वर्षांत ‘किल बिल’ हा चित्रपट वगळता त्याने अनेक चित्रपटात छोट्या मोठ्या भूमिका केल्या होत्या. किल बिल या चित्रपटात त्याने खलनायकाची भूमिका साकारली होती. मात्र मुख्य भूमिका असलेला ‘आ गया हिरो’ हा त्याचा बरेच वर्षांनंतरचा चित्रपट ठरला आहे. गोविंदाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून या चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला. हा चित्रपट २४ फे ब्रुवारी २०१७ रोजी प्रदर्शित होणार असून, लवकरच याबद्दलची माहिती देण्यात येईल असे त्याने लिहिलेय

first look of govindas comeback film aagaya hero is released


या चित्रपटाचे शूटिंग बरेच वर्षांपूर्वी सुरू झाले होते असे सांगण्यात येते. गोविंदाच्या होम प्रॉडक्शनच्या या चित्रपटाचे शूटिंग काही कारणांंमुळे थांबविण्यात आले होते. या चित्रपटाचे पूर्वीचे नाव अभिनय चक्र असे ठेवण्यात आले होते. गोविंदा सोबतच या चित्रपटात आशुतोष राणा देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

गोविंदाने राजकारणात प्रवेश केल्यावर चित्रपटातून तो गायबच झाला होता. दरम्यान त्याने काही चित्रपटात भूमिका केल्या. आता पुन्हा एकदा गोविंदा आपल्या चाहत्यांना नव्या अवतारात दिसणार आहे.  ‘आ गया हिरो’ या चित्रपटात तो आयपीएस आॅफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. गोविंदा व त्याच्या चाहत्यांसाठी आजचा दिवस आनंदाचा ठरला असे म्हणायला हरकत नाही. 

Releasing Feb 24th ' 17. Stay tuned for more updates very soon.#GovindaIsBack#AaGayaHeropic.twitter.com/WeYW0rL2yN— Govinda (@Govinda_HeroNo1) December 21, 2016}}}} ">http://

}}}} ">Releasing Feb 24th ' 17. Stay tuned for more updates very soon.#GovindaIsBack#AaGayaHeropic.twitter.com/WeYW0rL2yN— Govinda (@Govinda_HeroNo1) December 21, 2016

Web Title: Govind's birthday gift to his fans; First came the 'come hero'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.