गोविंदा आणि रवीना टंडनची जोडी झळकणार तब्बल 11 वर्षांनंतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2017 11:32 IST2017-03-10T06:02:01+5:302017-03-10T11:32:01+5:30

गोविंदा आणि रवीना टंडन यांची जोडी नव्वदीच्या दशकात खूप प्रसिद्ध होती. त्यांनी दुल्हे राजा, बडे मियाँ छोटे मियाँ यांसारख्या ...

Govinda and Raveena Tandon will be seen together after 11 years | गोविंदा आणि रवीना टंडनची जोडी झळकणार तब्बल 11 वर्षांनंतर

गोविंदा आणि रवीना टंडनची जोडी झळकणार तब्बल 11 वर्षांनंतर

विंदा आणि रवीना टंडन यांची जोडी नव्वदीच्या दशकात खूप प्रसिद्ध होती. त्यांनी दुल्हे राजा, बडे मियाँ छोटे मियाँ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते, त्यांचे हे सगळेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले होते. या दोघांची केमिस्ट्री चित्रपटात खूपच चांगली वाटत असे. पण त्याचसोबत या दोघांची नृत्याची स्टाइलदेखील प्रेक्षकांना आवडत असे. ते दोघेही नृत्य करताना संपूर्णपणे नृत्याचा आनंद लुटतात. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर नृत्य करताना नेहमीच एक हास्य पाहायला मिळते. गोविंदा आणि रवीना यांची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
2006ला प्रदर्शित झालेल्या सँडविज या चित्रपटात त्या दोघांनी काम केले होते. त्यानंतर त्या दोघांची जोडी मोठ्या पडद्यावर झळकलीच नाही. आता ते दोघे 11 वर्षांनंतर एकत्र येणार आहेत. पण ते दोघे कोणत्या चित्रपटासाठी एकत्र येत नसून ते दोघे एका पुरस्कार सोहळ्यासाठी एकत्र येणार आहेत. एका पुरस्कार सोहळ्यात ते एकत्र नृत्य सादर करणार आहेत. अखियोसे गोली मारे, कुर्ता फाड के यांसारख्या त्यांच्या प्रसिद्ध गाण्यांवर ते थिरकरणार आहेत. गोविंदा रवीनासोबत नृत्य करण्यासाठी खूप उत्सुक आहे. त्याने एका वर्तमानपत्राला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, रवीनासोबत इतक्या वर्षांनंतर पुन्हा एकदा परफॉर्म करायला खूप मजा येणार आहे. रवीनादेखील या पुरस्कार सोहळ्यात गोविंदासोबत थिरकण्यासाठी खूप उत्सुक आहे. रवीना सांगते, गोविंदासोबत नृत्य करताना नेहमीच मजा येते. आम्ही नेहमीच धमाल मस्ती करत नृत्य करतो. मी त्याच्यासोबत परफॉर्म करण्याची वाट पाहात आहे. 


Web Title: Govinda and Raveena Tandon will be seen together after 11 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.