गोविंदा करणार पुन्हा दमदार पदार्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2017 18:00 IST2017-08-28T12:30:33+5:302017-08-28T18:00:36+5:30

गोविंदाने आ गया हिरो या चित्रपटातून धमाकेदार एंट्री करण्याचा बॉलिवूडमध्ये प्रयत्न केला होता. मात्र हा प्रयत्न फारसा काही यशस्वी ...

Govinda again makes good debut | गोविंदा करणार पुन्हा दमदार पदार्पण

गोविंदा करणार पुन्हा दमदार पदार्पण

विंदाने आ गया हिरो या चित्रपटातून धमाकेदार एंट्री करण्याचा बॉलिवूडमध्ये प्रयत्न केला होता. मात्र हा प्रयत्न फारसा काही यशस्वी झाला नाही. गोविंदाचा आ गया हिरो हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला. गोविंदाचे फॅन्स ही विचारात होते की गोविंदाने असा चित्रपट कसा तयार केला. आता गोविंदाच्या फॅन्ससाठी आमच्याकडे आणखीन एक खूशखूरी आहे. गोविंदा पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये आपल्या धमाकेदार एंट्रीसाठी तयार आहे. या गोष्टीचा खुसाला खुद्द गोविंदाने केला आहे. एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीनुसार गोविंदा पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये एंट्री करणार आहे. हे वर्ष संपताच गोविंदा बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा कमबॅक करणार आहे. तसेच यावेळी तो मुलगा यशवर्धन आहुजाच्या बॉलिवूड डेब्यूबाबत बोलला. ''यशवर्धन सध्या लंडनमध्ये आपले शिक्षण पूर्ण करतो आहे. चित्रपटातील छोट्या छोट्या गोष्टी त्याला समजतात. आम्ही जेव्हा आमच्या करिअरची सुरुवात केली तेव्हा या गोष्टी आम्हाला माहित नव्हत्या. आताचे हिरो पदार्पण पूर्वीच आपल्या लूकवर आणी बॉडीवर काम करतात. आम्हाला जे मिळाले ते काम आम्ही खूप मेहनतीने केले.''

काही दिवसांपूर्वीच गोविंदा जग्गा जासूस चित्रपटाला घेऊन चर्चेत आला होता. दिग्दर्शक अनुराग बासूबद्दल त्यांने सोशल मीडियावर नाराजी सुद्धा व्यक्त केली होती. जग्गा जासूसमध्ये गोविंदाचा कॅमिओ रोल अनुरगाने कट केला होता. 

Web Title: Govinda again makes good debut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.