Govind Namdev सारख्या दिग्गज कलाकारदेखील लोक देत नव्हते काम, उधारीवर केलाय उदरनिर्वाह

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2022 01:11 PM2022-10-21T13:11:32+5:302022-10-21T13:15:04+5:30

एका मुलाखतीत ते म्हणाले, लोकांकडून पैसे उधार घेत मी कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता.

Govind Namdev revealed he was not getting work 2 years run household udhar debts | Govind Namdev सारख्या दिग्गज कलाकारदेखील लोक देत नव्हते काम, उधारीवर केलाय उदरनिर्वाह

Govind Namdev सारख्या दिग्गज कलाकारदेखील लोक देत नव्हते काम, उधारीवर केलाय उदरनिर्वाह

googlenewsNext

चित्रपटांच्या झगमगत्या आणि ग्लॅमरने भरलेल्या जगात अनेक बड्या स्टार्सशी संबंधित धक्कादायक किस्से ऐकायला मिळतात. अलिकडेच प्रसिद्ध टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेते गोविंद नामदेव (Govind Namdev) अशाच काही कारणांमुळे प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. 'शोले और शबनम' या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. यानंतर ते अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसले. या नकारात्मक पात्रांमुळे अनेक लोक त्यांना गर्विष्ठ आणि वाईट समजू लागले आणि यासगळ्याचा त्यांच्या करिअरवर वाईट परिणाम झाला. गोविंद यांनी आपल्या  मुलाखतीत सांगितले की, लोकांच्या गैरसमजांमुळे त्यांना कामासाठी भटकावे लागले.

गोविंद नामदेव यांनी सांगितले की, एकेकाळी त्यांना अशाच भूमिका मिळू लागल्या. त्या काळात त्यांच्यावर गर्विष्ठ असण्याचा आरोपही झाला. त्यामुळे त्यांना काम मिळणे बंद झाले. हिंदुस्तान टाईम्सशी साधताना गोविंद यांनी सांगितले की ते शूटिंगच्या ठिकाणी जाऊन कसं काम मागायचं. या कठीण काळातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी वर्षानुवर्षे संघर्ष करावा लागला. 

लोकांनी पसरवली अफवा 
गोविंद नामदेव यांनी सांगितले की, जेव्हा शोला आणि शबनम हा चित्रपट प्रदर्शित झाले, त्यानंतर त्यांना सर्व पोलीस निरीक्षकांच्या भूमिका मिळू लागल्या. त्यांना टाईप कास्ट होईल अशी भीती वाटत होती म्हणून त्यांनी २-३ भूमिका नाकारल्या. तेव्हापासून इंडस्ट्रीत त्यांचा वाईट काळ सुरू झाला होता. लोकांनी अफवा पसरवायला सुरुवात केली की अभिनेता खऱ्या आयुष्यात खूप अहंकारी आहे.


सेटवर जाऊन मागितलं काम
टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये दिसलेले अभिनेते गोविंद म्हणतात, 'लोक म्हणायचे की तो नवीन आहे आणि कोणालाही रिजेक्ट करतो. त्यानंतर लोकांनी मला चित्रपटासाठी विचारणं बंद केलं. मला कोणी काम दिलं नाही. मी सेटवर जाऊन काम मागू लागलो, तेव्हाही लोक असेच बोलायचे. लोक म्हणायचे की आमची एकच भूमिका आहे आणि ती म्हणजे इन्स्पेक्टरची.


कर्ज काढून घर चालवलं
68 वर्षीय अभिनेत्याने सांगितले की, 'हे 2 वर्षे चालले आणि मी अस्वस्थ होतो. माझ्यावर दबाव होता, मी कुटुंबासह मुंबईत आलो होतो. थिएटर वर्कशॉप वगैरे करून मी माझं घर चालवलं होतं. लोकांकडून उधारी घेत वेळ काढली. आज गोविंद नामदेव यांची इंडस्ट्रीतील दिग्गज स्टार्समध्ये गणना केली जाते आणि ते येत्या काळात OMG 2 आणि 'वो लड़की है कहाँ' सारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहेत.
 

Web Title: Govind Namdev revealed he was not getting work 2 years run household udhar debts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.