सुशांत सिंग राजपूतच्या नावावर राष्ट्रीय पुरस्काराची सुरुवात? अशी आहे चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2021 01:19 PM2021-02-22T13:19:56+5:302021-02-22T13:20:28+5:30

अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. पण चर्चा जोरात आहे.

government planning to honour late actor sushant singh rajput by naming a national award after him | सुशांत सिंग राजपूतच्या नावावर राष्ट्रीय पुरस्काराची सुरुवात? अशी आहे चर्चा

सुशांत सिंग राजपूतच्या नावावर राष्ट्रीय पुरस्काराची सुरुवात? अशी आहे चर्चा

googlenewsNext
ठळक मुद्दे34 वर्षीय सुशांत गत 14 जूनला त्याच्या घरी फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. त्याच्या अकाली एक्झिटने बॉलिवूडसह अख्ख्या देशाला मोठा धक्का बसला होता.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या निधनाला अनेक महिने उलटले. पण सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठीचा त्याच्या चाहत्यांचा लढा अद्यापही सुरु आहे. याचदरम्यान सुशांत सिंग राजपूतच्या नावावर राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची सुरुवात करण्याच्या हालचाली सुरु झाल्याची चर्चा आहे. अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. पण चर्चा जोरात आहे.
नवभारत टाईम्सने एका सूत्राच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, सुशांतच्या नावावर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सुरु करण्यासंदर्भात भाजपाने यासंदर्भात एक प्रस्ताव तयार केला आहे आणि यावर चर्चा सुरु आहे. हा प्रस्ताव कधी स्वीकारली जाईल आणि कधी या पुरस्काराची घोषणा होईल, याबाबत तूर्तास ठोस काहीही सांगता येणार नाही.

याआधीही सुशांतच्या नावावर काही मोठे करण्याची तयारी सुरु असल्याच्या बातम्या आल्या होत्या. मादाम तुसाद या जगप्रसिद्ध संग्रहालयाने ने सुशांतचा मेणाचा पुतळा उभारण्याचे बरेच प्रयत्न झालेत. मात्र अद्याप हा पुतळा तयार झालेला नाही. सुशांतबद्दलचे असे अनेक निर्णय, प्रस्ताव तयार आहेत. पण ते प्रत्यक्षात आलेले नाहीत. अशात सुशांतच्या नावावर पुरस्काराची सुरुवात होईल की नाही, हे येणारा काळच सांगते. सुशांतच्या स्मृतीत काहीतरी यादगार आणि भव्यदिव्य केले जावे, अशी चाहत्यांची इच्छा आहेच.

34 वर्षीय सुशांत गत 14 जूनला त्याच्या घरी फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. त्याच्या अकाली एक्झिटने बॉलिवूडसह अख्ख्या देशाला मोठा धक्का बसला होता. सुशांतचा मृत्यू कशाने झाला, याचा तपास अद्यापही सुरू आहे. सीबीआय, ईडी, एनसीबी अशा यंत्रणांचा तपास सुरुच आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या वडिलांनी अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. रियाने सुशांतचा पैसा हडपला, त्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप त्यांनी केला होता.
 

Web Title: government planning to honour late actor sushant singh rajput by naming a national award after him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.