गुगलने केला आर.डींचा सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2016 10:56 IST2016-06-27T05:26:35+5:302016-06-27T10:56:35+5:30

पंचमदा या नावाने बॉलिवुडमध्ये ओळखले जाणारे आर.डी बर्मन यांचा आज ७७वा जन्मदिवस आहे. त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने गुगलकडून त्यांचे डुडल ...

Google honors Kelly Rd | गुगलने केला आर.डींचा सन्मान

गुगलने केला आर.डींचा सन्मान

चमदा या नावाने बॉलिवुडमध्ये ओळखले जाणारे आर.डी बर्मन यांचा आज ७७वा जन्मदिवस आहे. त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने गुगलकडून त्यांचे डुडल बनवण्यात आले आहे. आर. डी यांचा गुगलने केलेला हा सन्मान आहे. आर.डी. बर्मन हे प्रसिद्ध संगीतकार सचिन देव बर्मन यांचे पुत्र आहेत. आर.डी यांनी शोले, यादों की बारात, मासूम यांसारख्या जवळजवळ ३३० चित्रपटांना संगीत दिले. आर. डींच्या गाण्यांनी ऐंशीच्या दशकात प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले होते. आर.डी हे तरुणांचे लाडके संगीतकार होते. त्यांची चुरा लिया है, एक लडकी को देखा, ओ मोझी रे यांसारखी गाणी प्रचंड गाजली होती. १९८३, १९८४, १९९५ या तीन वर्षांत त्यांनी फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा पुरस्कार मिळवला होता. 

Web Title: Google honors Kelly Rd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.