Good News : तैमूरची मम्मी करिना कपूर कामावर पतरली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2017 15:43 IST2017-07-04T10:13:56+5:302017-07-04T15:43:56+5:30

पतौडी घराण्याचा छोटा नवाब तैमूर अली खान याची मम्मा कामावर पतरलीय. होय, आज करिना आपल्या आगामी चित्रपटाच्या सेटवर पोहोचली. करिना कपूरचा सेटवरचा पहिला फोटो मेकअप आर्टिस्ट मिकी कॉन्टेक्टरने शेअर केला आहे.

Good News: Timur's mom Kareena Kapoor explains work! | Good News : तैमूरची मम्मी करिना कपूर कामावर पतरली!

Good News : तैमूरची मम्मी करिना कपूर कामावर पतरली!

ौडी घराण्याचा छोटा नवाब तैमूर अली खान याची मम्मा कामावर पतरलीय. होय, आज करिना आपल्या आगामी चित्रपटाच्या सेटवर पोहोचली. करिना कपूरचा सेटवरचा पहिला फोटो मेकअप आर्टिस्ट मिकी कॉन्टेक्टरने शेअर केला आहे. यात करिना लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसते आहे. स्लिम अ‍ॅण्ड ब्युटिफुल असेच करिनाचा हा फोटो पाहिल्यानंतर वाटते. करिनाला पाहिल्यानंतर तिचा हा फोटो शेअर करण्यापासून स्वत:ला रोखू शकला नाही, असे मिकीने हा फोटो शेअर करताना लिहिले आहे.
करिना कपूर डिसेंबरमध्ये आई झाली आणि उण्यापुºया सहा महिन्यानंतर कामावर परतलीही. करिना सध्या ‘वीरे दी वेडिंग’चे शूटींग करणार आहे. या चित्रपटानंतर अनेक स्क्रिप्ट सध्या ती वाचते आहे. लवकरच तिच्या आगामी प्रोजेक्टची घोषणा होऊ शकते. 



ALSO READ : बेगम करिना कपूर खानच्या रेड गाऊनवर खिळल्या सर्वांच्या नजरा!

अलीकडे मनीष मल्होत्राच्या घरच्या पार्टीत करिना ग्लॅमरस लूकमध्ये दिसली होती. बॅकलेस रेड गाऊनमध्ये आलेल्या करिनावर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या.
मुलाच्या जन्मानंतर करिनाच्या बॉलिवूड वापसीची सगळ्यांना प्रतीक्षा आहे. प्रेग्नंसीदरम्यान करिनाचे वजन खूप वाढले होते. गेल्या काही महिन्यांपासून करिना हे वजन कमी करण्यासाठी घाम गाळत होती. या काळात करिनाने आपले २० किलो वजन कमी केले. यासाठी करिना कडक डाएटवर होती. वर्कआऊट आणि कडक डाएट फॉलो केल्यानंतर आता कदाचित करिना आपल्या परफेक्ट शेपमध्ये पोहोचली आहे. त्यामुळे  करिना कामावर पतरली आहे. ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटात   तिच्याशिवाय सोनम कपूर आणि स्वरा भास्कर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

Web Title: Good News: Timur's mom Kareena Kapoor explains work!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.