दुसऱ्यांदा प्रेग्नंट आहे नेहा धुपिया, फोटो शेअर करत दिली GOOD NEWS
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2021 12:03 IST2021-07-19T11:57:28+5:302021-07-19T12:03:28+5:30
नेहा धुपिया आणि अंगद बेदी दोघेही प्रचंड आनंदी असल्याचे पाहायला मिळतंय. हा फोटो शेअर होताच नेहा आणि अंगद दोघांच्याही चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

दुसऱ्यांदा प्रेग्नंट आहे नेहा धुपिया, फोटो शेअर करत दिली GOOD NEWS
नेहा धुपिया सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. तिचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते. नुकतेच तिने काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटो नेहा धुपियाने बेबी बंम्प फ्लॉन्ट करताना दिसत आहे. हे फोटो शेअर करत नेहा दुसऱ्यांदा प्रेग्नंट असल्याचे तिने जाहीर केले आहे. नेहा धूपियाने आणि अंगद बेदीसह १० मे २०१८ ला लग्न केले होते. लग्नानंतर काहीच महिन्यांनी तिने पहिल्यांदा प्रेग्नंट असल्याचे जाहीर करत आपला आनंद साजरा केला होता. अंगद आणि नेहा दोघांच्या आयुष्यात गोंडस मुलीचे आगमन झाले होते. तिच्या मुलीचे नाव मेहर आहे. आता दुस-यांदा प्रेग्नंट असलेली नेहा तिचे फोटो शेअर करत समर्पक अशी कॅप्शनही दिली आहे.
खास कॅप्शनसह नेहाला तिचे हे खास फोटो शेअर करायचे होते. त्यासाठी दोन दिवस तिने कॅप्शनचा विचार केला. लिहीले की, ‘हे कॅप्शन 2 दिवस लागले… आणि मला वाटतं सुचलेलं सगळ्यात उत्तम म्हणजे देवा तुझे खूप आभार…’ शेअर केलेल्या फोटोत तिघेही खूप स्टायलिश दित आहेत. ब्लॅक कलरचे ड्रेसिंग करत अधिकच आकर्षक दिसत आहेत.
नेहा आणि दोघेही प्रचंड आनंदी असल्याचे पाहायला मिळतंय. हा फोटो शेअर होताच नेहा आणि अंगद दोघांच्याही चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. लग्नानंतरही नेहा संसारात बिझी झाली असली तरी तिचे कामही सुरु होते. मेहेरसोबत अनेकदा नेहा क्वॉलिटी टाईम एन्जॉय करताना दिसते. तिचे क्युट फोटो शेअर करतांना दिसते. ४० वर्षांच्या नेहा धूपियाने २००२ साली मिस इंडियाचा किताब जिंकला होता.
२००३मध्ये ‘कयामत’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आगामी काळात नेहा धूपिया एका वेब शोमध्ये कॉपच्या भूमिकेत दिसणार असून, या सीरीजमध्ये अभिनेत्री यामी गौतम देखील दिसणार आहे. याशिवाय ती विद्युत जामवाल आणि रुक्मिणी मैत्रांसोबत ‘सनक’ या अॅक्शन फिल्ममध्येही दिसणार आहे.