'जुगजुग जियो'च्या सेटवर वरुण धवन आणि अनिल कपूरमध्ये झालं चांगलं बॉण्डिंग, दोघांना करायचंय पुन्हा एकत्र काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 15:04 IST2022-04-07T15:03:23+5:302022-04-07T15:04:09+5:30
Jugjugg Jiyo Movie: वरुण धवन (Varun Dhawan) आणि अनिल कपूर (Anil Kapoor) 'जुगजुग जियो' या चित्रपटात एकत्र काम करताना दिसणार आहेत.

'जुगजुग जियो'च्या सेटवर वरुण धवन आणि अनिल कपूरमध्ये झालं चांगलं बॉण्डिंग, दोघांना करायचंय पुन्हा एकत्र काम
बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) आणि अभिनेते अनिल कपूर (Anil Kapoor) 'जुगजुग जियो' (Jugjugg Jiyo Movie) या चित्रपटात एकत्र काम करताना दिसणार आहेत. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान त्या दोघांनी एकमेकांसोबत खूप छान वेळ व्यतित केला. त्यामुळेच त्यांच्यात घनिष्ठ मैत्री झाल्याचे दिसून येत आहे. या चित्रपटानंतर या दोघांना पुन्हा एकत्र काम करायचे आहे.
अभिनेता अनिल कपूरची कामाबद्दलची शिस्त पाहून वरुण धवनला त्यांच्याकडून खूप प्रेरणा मिळाली आहे. तर दुसरीकडे सेटवर वरुणचे कमाप्रती समर्पण आणि मेहनत बघून अनिल कपूर ही प्रभावित झाले आहेत. मुलाखतीदरम्यान दोघेही एकमेकांची स्तुती करताना दिसत आहेत, त्यामुळे पहिल्यांदा काम करताना दोघांनी एकत्र खूप मजा केली असेल असा अंदाज बांधता येतो. मिळालेल्या माहितीनुसार, दोघांनाही भविष्यात एकमेकांसोबत काम करू इच्छितात आणि त्यासाठी एकमेकांची शिफारसही करत आहेत.
जुगजुग जियो चित्रपटात अनिल कपूर आणि वरूण धवन यांच्यासोबत कियारा आडवाणी, नीतू कपूर हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज मेहता करत आहेत, त्यांनी अक्षय कुमार , करीना कपूर , कियारा अडवाणी आणि दिलजीत दोसांज अभिनित गुड न्यूज या ब्लॉकबस्टर चित्रपटाचेही दिग्दर्शन केले होते. जुगजुग जियो हा चित्रपट २४ जून २०२२ला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.