समाजाच्या वंचित स्तरातील मुलांनी घेतली गोलमाल अगेनच्या कलाकारांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2017 15:41 IST2017-11-03T10:11:22+5:302017-11-03T15:41:22+5:30
मुकुल माधव फाऊंडेशन (एमएमएफ)ने सामाजिक विकास केंद्र सोशल डेवलपमेंट सेंटर मालाड, मुंबई येथील वंचित मुलांसाठी ‘गोलमाल अगेन’ च्या कलाकारांची ...
समाजाच्या वंचित स्तरातील मुलांनी घेतली गोलमाल अगेनच्या कलाकारांची भेट
या प्रसंगी बोलताना श्री रोहित शेट्टी म्हणाले, आपल्या आवडत्या चित्रपट अभिनेत्यांना भेटण्याबद्दल या मुलांमध्ये ओसंडून वाहणारा उत्साह आणि कुतूहल पाहणे हा मोठा आनंद आहे. या उपक्रमामुळे या मुलांप्रमाणेच अभिनेत्यांचेही मनोबल उंचावले आहे.या खट्याळ मुलांमधील कधीही हार
मानणाऱ्या उमेदीने आणि खळाळत्या उत्साहाने या अभिनेत्यांना भरपूर सकारात्मक ऊर्जा पुरविली आहे. येथून परतताना आमच्या मनात या कार्यक्रमाच्या खूप साऱ्या आनंदी स्मृती रेंगाळत राहणार आहेत. इथे उपस्थित राहण्याची आणि या मुलांसाठी केल्या जाणाऱ्या कामाप्रती त्यांनी जपलेल्या कटिबद्धतेचे कौतुक करण्याची संधी आम्हाला दिल्याबद्दल आम्ही मुकुल माधव फाउंडेशनचेही आभार मानतो.
‘गोलमाल ’चे सीरिजचे आजवरचे सगळेच सिनेमे हिट गेले आहेत. ‘गोलमाल ’सीरीजमधला पहिला चित्रपट ‘गोलमाल'सन २००६ मध्ये आला होता. त्यानंतर प्रत्येकी दोन वर्षांच्या अंतराने ‘गोलमाल रिटर्न्स’आणि ‘गोलमाल 3’ रिलीज झाले होते. त्यानंतर तब्बल सात वर्षांनंतर दिग्दर्शक रोहित शेट्टी ‘गोलमाल अगेन’ घेऊन आला. अजय देवगण व परिणीती चोप्रा स्टारर ‘गोलमाल अगेन’ बॉक्सऑफिसवर रिलीज झाला आणि केवळ इतकेच नाही तर पहिल्याच दिवशी या चित्रपटाने ८० टक्के आॅक्यूपेन्सी रेटही नोंदवला. यावरून या दिवाळीत ‘गोलमाल अगेन’ कमाईचे सगळे रेकॉर्ड तोडले. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने शाहरूख खानच्या ‘रईस’चा रेकॉर्ड मोडीत काढला . याचवर्षी शाहरूखचा हा चित्रपट रिलीज झाला होता.त्यावेळी शाहरूखचा ‘रईस’ आणि हृतिक रोशनचा ‘काबील’ असा मुकाबला बॉक्सऑफिसवर रंगला होता.