गोलमाल अगेनचे शूटिंग सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2017 19:47 IST2017-03-09T14:13:53+5:302017-03-09T19:47:16+5:30

रोहित शेट्टीच्या गोलमाल अगेनचे शूटिंग सुरू झाले आहे. चित्रपटातील अभिनेत्री परिणीती चोप्रा हिने यासंदर्भात इन्स्टाग्रामवर छायाचित्र टाकले आहे.

Golmaal again started shooting | गोलमाल अगेनचे शूटिंग सुरू

गोलमाल अगेनचे शूटिंग सुरू

हित शेट्टीच्या गोलमाल अगेनचे शूटिंग सुरू झाले आहे. चित्रपटातील अभिनेत्री परिणीती चोप्रा हिने यासंदर्भात इन्स्टाग्रामवर छायाचित्र टाकले आहे.
या चित्रपटात अजय देवगण, अर्शद वारसी, कुणाल खेमू, तुषार कपूर, परिणीती चोप्रा, नील नितीन मुकेश यांच्या प्रमुख भूमिका असतील. गोलमाल मालिकेतील हा चौथा चित्रपट आहे.
परिणीतीने हा फोटो प्रसिद्ध करताना, त्याखाली फोटोओळ लिहिली आहे. ‘याची सुरूवात झाली आहे. गो-गो-गोलमाल.’ येत्या दिवाळीत हा चित्रपट प्रदर्शित होईल. या चित्रपटात तब्बू देखील असणार आहे. 
यापूर्वी गोलमाल: फन अनलिमिटेड (२००६), गोलमाल रिटर्न्स (२००८) आणि गोलमाल ३ (२०१०) हे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत.
 

Web Title: Golmaal again started shooting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.