​ ‘मोगली’ला खायचेतं गोलगप्पे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2016 17:47 IST2016-03-30T00:47:10+5:302016-03-29T17:47:10+5:30

‘दी जंगल बुक’ या चित्रपटाकडे बच्चेकंपनींसह मोठ्यांचेही डोळे लागले आहे. या चित्रपटाचा ट्रेलर बघितल्यानंतर सर्वांची उत्कंठा वाढली आहे. येत्या ...

Golgpe to eat 'Mowgli'! | ​ ‘मोगली’ला खायचेतं गोलगप्पे!

​ ‘मोगली’ला खायचेतं गोलगप्पे!

ी जंगल बुक’ या चित्रपटाकडे बच्चेकंपनींसह मोठ्यांचेही डोळे लागले आहे. या चित्रपटाचा ट्रेलर बघितल्यानंतर सर्वांची उत्कंठा वाढली आहे. येत्या ८ एप्रिलला  ‘दी जंगल बुक’ जगभर रिलीज होत आहे. ‘दी जंगल बुक’ मध्ये भारतीय वंशाचा आणि सध्या अमेरिकेत राहत असलेल्या नील सेठी याने जंगलांमध्ये प्राण्यांसोबत राहणाºया ‘मोगली’ची भूमिका साकारली आहे. ‘दी जंगल बुक’च्या प्रमोशनसाठी नील सध्या भारतात आला आहे. हजारो मुलांमधून ‘मोगली’च्या भूमिकेसाठी नीलची निवड झाली आहे. प्रमोशनसाठी भारतात आलेल्या नीलने पत्रकारांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. भारतातील सर्वाधिक कुठली गोष्ट आवडते, यावर क्षणाचाही विलंब न करता ‘गोलगप्पे’ (पाणीपुरी) असे उत्तर नीलने दिले. माझे आजोबा भारतात असतात त्यामुळे मी यापूर्वीही भारतात आलेला आहे. हे माझे घर आहे. त्यामुळे मला भारत आवडतो. मला गोलगप्पे खायला खूप आवडतात. एकदा मी एकाचवेळी २७ गोलगप्पे खाल्ले होते. माझ्या बहिणीला मला हरवायचे होते. पण २७ गोलगप्पे खाऊनही मी हरलोच, असे नीलने सांगितले. याहीवेळी मी खूप गोलगप्पे खाणार आहे, असेही तो म्हणाला.

 

Web Title: Golgpe to eat 'Mowgli'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.