विराटने अनुष्कासाठी केलेलं ‘ते’ tweet ठरलं 'GOLDEN TWEET'
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2016 16:53 IST2016-12-06T15:44:36+5:302016-12-06T16:53:20+5:30
भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीचे अनुष्का शर्माची पाठराखण करणारं tweet ‘गोल्डन ट्विट आॅफ द ईअर’ ठरलं आहे. टी-20 ...

विराटने अनुष्कासाठी केलेलं ‘ते’ tweet ठरलं 'GOLDEN TWEET'
भ रतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीचे अनुष्का शर्माची पाठराखण करणारं tweet ‘गोल्डन ट्विट आॅफ द ईअर’ ठरलं आहे. टी-20 वर्ल्ड कपमधील भारत - आॅस्ट्रेलिया सामन्यातील पराभवानंतर सोशल मिडियावर अनुष्काची खिल्ली उडवली जात होती. यावरुन विराट कोहलीने संताप व्यक्त करत अनुष्काची बाजू घेत टीकाकारांना खरमरीत उत्तर दिलं होतं. त्याचं हेच tweet 40 हजाराहून जास्त वेळा retweet करण्यात आलं आहे.
![]()
twitter प्रत्येक वर्षी भारतातील एक tweet निवडते ज्याला सर्वात जास्त प्रतिसाद मिळाला आहे. यावर्षी विराट कोहलीने अनुष्काने केलेलं tweet 40 हजाराहून जास्त वेळा retweet करण्यात आलं असून त्याला एक लाखाहून जास्त लाईक्स मिळाले आहेत. ‘अनुष्काला लक्ष्य करणा-यांनो थोडी शरम बाळगा. अनुष्काकडून मला नेहमीच सकारात्मकता शिकायला मिळाली आहे’, असे tweet करत विराटने सोशल मीडियावरील टीकाकारांना उत्तर दिले होते.
अनुष्का व विराटच्या ब्रेकअपची बातमी मध्यंतरी आली होती. या बातमीनंतर अनुष्का शर्माची खिल्ली उडवणारे मेसेज सोशल मीडियावर फिरत होते. अनुष्काशी प्रेमसंबंध तुटल्यामुळे टी-20 वर्ल्डकपदरम्यान विराट अफलातून कामगिरी करत असल्याचे या मेसेजमध्ये म्हटले गेले होते. एकंदर काय तर, अनुष्का विराटसाठी अनलकी आहे, असे अप्रत्यक्षपणे या मेसेजमधून सांगण्याचा प्रयत्न केला गेला होता. अनुष्कासोबतच्या ब्रेकअपच्या बातमीनंतर अचानक विराट चांगला खेळू लागला होता. याच पार्श्वभूमीवर वर्ल्डकप विजयापर्यंत अनुष्कापासून दूर रहाण्याचा सल्ला या मेसेजेसमधून विराटला दिला जात होता. मात्र विराटने एका महिलेची अशाप्रकारे खिल्ली उडवणं अयोग्य असल्याचं सांगत ठाम मत मांडलं होतं. ज्याला त्याच्या फॉलोअर्स आणि लोकांनीही प्रतिसाद देत योग्य असल्याचं दाखवून दिलं.