‘शोले’च्या शूटिंगवेळी चहा मिळाला नसल्याने गब्बर अमजद खानने सेटवर आणल्या होत्या चक्क दोन म्हशी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2017 15:38 IST2017-09-01T10:08:17+5:302017-09-01T15:38:17+5:30

आजही जेव्हा-जेव्हा ‘शोले’ चित्रपटाचे नाव काढले जाते तेव्हा-तेव्हा ‘गब्बर’ हे नाव सर्वांत अगोदर आपल्यासमोर येते. ज्या पद्धतीची भूमिका अभिनेता ...

Gobar Amjad Khan had brought the set on two sets of buffaloes as he did not get tea during the shooting of Sholay. | ‘शोले’च्या शूटिंगवेळी चहा मिळाला नसल्याने गब्बर अमजद खानने सेटवर आणल्या होत्या चक्क दोन म्हशी!

‘शोले’च्या शूटिंगवेळी चहा मिळाला नसल्याने गब्बर अमजद खानने सेटवर आणल्या होत्या चक्क दोन म्हशी!

ही जेव्हा-जेव्हा ‘शोले’ चित्रपटाचे नाव काढले जाते तेव्हा-तेव्हा ‘गब्बर’ हे नाव सर्वांत अगोदर आपल्यासमोर येते. ज्या पद्धतीची भूमिका अभिनेता अमजद खान यांनी ‘शोले’मध्ये साकारली, त्यावरून त्यांना कोणीही विसरणार नाही हे तेवढेच खरे आहे. वास्तविक अमजद खान यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले. परंतु त्यांना खरी ओळख आणि ‘गब्बर’ हे नाव ‘शोले’मुळे मिळाले. चित्रपटात त्यांनी खलनायक साकारताना एका निर्दयी डाकूची भूमिका साकारली. मात्र अशातही त्यांना एखाद्या अभिनेत्याप्रमाणे स्मरण केले जाते. त्याच्या खºया नावापेक्षा ‘गब्बर’ या नावानेच त्यांना आजही ओळखले जाते. 

वास्तविक अमजद खान यांचा या भूमिकेसाठी सुरुवातीला विचार केला गेला नव्हता. पण नशिबाने ही भूमिका अमजद यांच्या पदरात पडली अन् त्यांनी त्यास पुरेपूर न्यायही दिला. जेव्हा सलीम खान यांनी या चित्रपटाची कथा लिहिली होती, तेव्हा त्यांनी खलनायक म्हणून अमजद खान यांचे नाव सुचविले नव्हते. मात्र मध्येच असे काही घडले की, ही भूमिका अमजद यांना मिळाली. अमजद यांना ही भूमिका मिळविण्यासाठी डॅनीचे बरेचसे सहाय्य लाभले. 



असो, आज आम्ही या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे अमजद खानशी संबंधित काही मजेशीर किस्से तुम्हाला सांगणार आहोत. वास्तविक अमजद खान यांच्या सवयी इतरांपेक्षा काहीशा वेगळ्या होत्या. त्यामुळेच त्यांना अखेरपर्यंत स्वत:चे वेगळेपण जपण्यासाठी ओळखले गेले. त्यांच्या सवयीपैकी एक सवय म्हणजे त्यांना चहा खूप आवडायचा. ते चहाचे खूपच अ‍ॅडिक्ट होते. महानायक अमिताभ बच्चन यांनी दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या चहाचा हा किस्सा सांगितला होता. अमिताभ म्हणाले होते की, ‘अमजद दिवसभरात किती चहा प्यायचे याची गणती त्यांच्यादेखील स्मरणात राहत नसायची. जेव्हा त्याला सेटवर चहा मिळत नव्हता, तेव्हा त्याला काम करणे खूपच अवघड व्हायचे.’

‘एकदा आम्ही पृथ्वी थिएटरमध्ये एक प्ले रिहर्सल करीत होतो. काही वेळानंतर अमजद यांना चहाची तलब लागली. त्यांनी चहाची मागणी केली. परंतु त्यांना चहा मिळालाच नाही. वारंवार चहाची मागणी करूनही चहा मिळत नसल्याने वैतागून त्यांनी चहा का दिला जात नाही, अशी विचारणा केली. त्यावर सांगण्यात आले की, दूध संपले आहे. बस्स हीच बाब अमजद यांना अशी काही खटकली की दुसºया दिवशी ते थेट सेटवर दोन म्हशी घेऊन आले. त्यांनी सेटवरच या दोन्ही म्हशी बांधल्या. तसेच सर्व स्टाफला त्यांनी सांगितले की, ‘आता तर दूध कमी पडणार नाही ना?’ 

Web Title: Gobar Amjad Khan had brought the set on two sets of buffaloes as he did not get tea during the shooting of Sholay.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.