‘राज ४’मध्ये गौरवची वर्णी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2016 07:04 IST2016-02-14T14:04:01+5:302016-02-14T07:04:01+5:30
मॉडेल गौरव अरोरा सध्या जाम खुश आहे. तो पदर्पण करीत असलेला ‘लव्ह गेम्स’ हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आधीच एक ...

‘राज ४’मध्ये गौरवची वर्णी
म डेल गौरव अरोरा सध्या जाम खुश आहे. तो पदर्पण करीत असलेला ‘लव्ह गेम्स’ हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आधीच एक मोठी संधी त्याला चालून आली.
इम्रान हाश्मी लीडमध्ये असलेल्या ‘राज ४’मध्ये त्याला कास्ट करण्यात आले आहे.
त्यामुळे आनंदी झालेल्या गौरवने म्हटले की, ‘भट कँपमधील फिल्म मिळणे इंडस्ट्रीमध्ये खूप मानाची गोष्ट असते. कंगणा, इम्रान, जॉन अब्राहम यासारखे स्टार्स भट कँपनेच दिले आहेत. नवोदित कलाकार, संगीतकार, गायकांना नेहमीच संधी देणाºया भट प्रोडक्शनमध्ये माझी वर्णी लागल्याने मी फार आनंदी आहे. माझ्या करिअरसाठी हा फार मोठा टप्पा आहे.’
येत्या १ एप्रिल रोजी त्याचा ‘लव्ह गेम्स’ रिलीज होत आहे. या आधी गौरवने अनेक टीव्ही जाहिरातींमधून काम केलेले आहे. गौरवच्या रूपात आणखी एक नवा हीरो इंडस्ट्रीला मिळतो का याची उत्सुकता आहे.