फिल्ममेकर्सना स्वातंत्र्य द्या - महेश भट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 08:45 IST2016-01-16T01:06:46+5:302016-02-10T08:45:57+5:30
सेन्सॉर बोर्डाच्या मुद्दयावर केंद्र सरकारकडून समिती स्थापन करण्यात आल्यानंतर दिग्गज चित्रपट दिग्दर्शक महेश भट यांनी या विषयावर आपले मत ...

फिल्ममेकर्सना स्वातंत्र्य द्या - महेश भट
स न्सॉर बोर्डाच्या मुद्दयावर केंद्र सरकारकडून समिती स्थापन करण्यात आल्यानंतर दिग्गज चित्रपट दिग्दर्शक महेश भट यांनी या विषयावर आपले मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले, ''केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र संस्था भविष्यामध्ये स्वातंत्र्य देणार असल्याचे नेहमी बोलले जाते. मात्र, वर्तमानात हेच स्वातंत्र्य का मिळत नाही? चित्रपट बनवणार्यांना संस्थेकडून स्वातंत्र्य का दिले जात नाही, हा मला न उलगडलेला प्रश्न आहे. असे असले तरी, नव्या समितीकडून फिल्ममेकर्सना अपेक्षित बदल केले जातील, असा विश्वास मला आहे. प्रख्यात दिग्दर्शक श्याम बेनेगल यांची सेन्सॉर बोर्डाशी संबंधित नव्या समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. या पार्श्वभूमीवर भट यांनी वरील मुद्दे मांडले.