मुलगी झाली हो...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2016 22:59 IST2016-08-26T17:14:46+5:302016-08-26T22:59:04+5:30
शाहीद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या आयुष्यात नव्या पाहुणीचे आगमन झाले आहे. आज (दि. २६) सायंकाळी ७ वाजून ५६ ...

मुलगी झाली हो...
शाहीद स्वत: ट्विट करून ही आनंदाची बातमी शेअर केली. त्याने लिहिले, तिचे आगमन झाले आहे.आणि आमच्या आनंदाचे वर्णन करण्यासाठी शब्ददेखील अपुरे पडत आहेत. तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा-सदिच्छांसाठी खूप खूप धन्यवाद!
She has arrived and words fall short to express our happiness. Thank you for all your wishes.— Shahid Kapoor (@shahidkapoor) 26 August 2016
परवा सायंकाळीच मीराला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. शाहीद आपल्या लाडक्या पत्नीची काळजी घेत पूर्णवेळ तिच्या सोबत होता. डॉ. किरण कोएल्हो यांनी बाळाची डिलिव्हरी केली. मिळालेल्या माहितीनुसार, आई आणि मुलीची तब्येत एकदम ठीक असून बाळाचे वजन २.८ किग्रॅ आहे.
गेल्या वर्षी जुलै महिन्यात शाहीद-मीरा लग्न बंधनात अडकले होते. मीराच्या प्रेग्नंसीची बातमी आल्यापासून त्यांच्या कुटुंबाला आणि चाहत्यांना या क्षणाची ओढ लागली होती. शाहीदसुद्धा बाळाच्या आगमनाची माहिती सोशल मीडियावर वेळोवेळी फोटो शेअर करून देत होता. आता सर्वांना वेध लागले आहेत ते या दाम्पत्याचा आनंद शतपटीने वाढवणाऱ्या बाळच्या पहिल्या फोटोचे.
‘लोकमत सीएनएक्स’तर्फे शाहीद-मीराला खूप खूप शुभेच्छा!