सभ्य वरूणने जॅकलीनला चिडवले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2016 10:29 IST2016-03-19T17:18:01+5:302016-03-19T10:29:51+5:30

वरूण धवनला इंडस्ट्रीतील सर्वांत चांगले आचरण असणारा अभिनेता म्हणून ओळखले जाते. त्याच्या एकंदरीतच सर्व चित्रपटांमध्ये तो एकदम हॉट लुकमध्ये ...

Gentle Varun angry with Jacqueline? | सभ्य वरूणने जॅकलीनला चिडवले?

सभ्य वरूणने जॅकलीनला चिडवले?

ूण धवनला इंडस्ट्रीतील सर्वांत चांगले आचरण असणारा अभिनेता म्हणून ओळखले जाते. त्याच्या एकंदरीतच सर्व चित्रपटांमध्ये तो एकदम हॉट लुकमध्ये दिसत असला तरी अत्यंत सभ्य दिसतो. मात्र, असे काय झाले की, त्याने जॅकलीन फर्नांडिसला त्याच्या हाताचे मधले बोट दाखवून चिडवले.

तुम्ही त्याचा काही दुसरा अर्थ काढण्याअगोदर तुम्हाला हे कळणे खुप गरजेचे होते की, हे सर्व मस्ती म्हणून सुरू होते. त्याचा काहीही दुसरा अर्थ नव्हता. दुबईला ‘तोईफा 2016’ ला ते दोघे जात होते. ते दोघे एअरपोर्टवर वेड्यासारखे धम्माल करत होते. जॅकलीनने ठरवले की, तिला वरूणची फॅन म्हणून एक व्हिडिओ तयार करायचा आहे. आणि त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी प्रयत्न करायचा आहे.

सुपरस्टार असल्यासारखा अ‍ॅटीट्यूड दाखवून त्याने तिला काहीही प्रतिसाद दिला नाही. आणि तिला हाताचे मधले बोट वर करून चिडवले. तिने हा व्हिडिओ तिच्या स्रॅपचॅट अकाऊंटवर पोस्ट केला आहे. खुप फनी हा व्हिडिओ आहे. ते दोघे ‘ढिशूम’ चित्रपटात एकत्र काम करत आहेत. त्यांची जोडी एकत्र फार मस्त दिसत आहे.

https://www.instagram.com/p/BDFm4h4Ip4Q/?taken-by=jacquelinef143&hl=en

Web Title: Gentle Varun angry with Jacqueline?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.