Genius Trailer: नवाजुद्दीन आणि सनी देओलचा 'मुलगा' आमनेसामने, बघा धमाकेदार ट्रेलर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2018 15:24 IST2018-07-24T15:13:34+5:302018-07-24T15:24:31+5:30
'गदर'चे दिग्दर्शक अनिक शर्मा यांचा मुलगा उत्कर्ष शर्मा याच्या आगानी 'जीनिअस' चा ट्रेलर रिलीज करण्यात आलाय. 'जीनिअस' या सिनेमाच्या माध्यमातून उत्कर्ष बॉलिवूडमध्ये हिरो म्हणून एन्ट्री घेतोय.

Genius Trailer: नवाजुद्दीन आणि सनी देओलचा 'मुलगा' आमनेसामने, बघा धमाकेदार ट्रेलर
मुंबई : बॉलिवूडचा ब्लॉकबस्टर सिनेमा 'गदर'मधील सनी देओलचा रिल लाइफ मुलगा पुन्हा परत आला आहे. 'गदर'चे दिग्दर्शक अनिक शर्मा यांचा मुलगा उत्कर्ष शर्मा याच्या आगानी 'जीनिअस' चा ट्रेलर रिलीज करण्यात आलाय. 'जीनिअस' या सिनेमाच्या माध्यमातून उत्कर्ष बॉलिवूडमध्ये हिरो म्हणून एन्ट्री घेतोय.
अॅक्शन आणि रोमान्सने भरपूर हा मसालापट उत्कर्षचा पहिला सिनेमा आहे. त्याचं करिअर हा सिनेमा ठरवणार आहे. महत्वाची बाब म्हणजे एका हिरोसाठी आवश्यक लूक्स, बॉडी त्याचेकडे आहे. त्याळे त्याचा हा चार्म आता प्रेक्षकांना किती भावतो हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.
अनिल शर्मा यांनीच या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमात मिथुन चक्रवर्ती यांचीही महत्वाची भूमिका आहे. तर नवाजुद्दीन सिद्दीकी हा व्हिलनच्या भूमिकेत दिसणार आहे. उत्कर्षसोबत या सिनेमातून इशिता चौहान सुद्धा बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.