जेनेलिया देशमुखचा आवडता मराठमोळा पदार्थ कोणता? म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 02:00 PM2024-04-03T14:00:52+5:302024-04-03T14:03:16+5:30

महाराष्ट्राची सून असलेली जेनेलियाला महाराष्ट्रीय पदार्थ खूप आवडतात.

Genelia Deshmukh's favorite maharashtrian food | जेनेलिया देशमुखचा आवडता मराठमोळा पदार्थ कोणता? म्हणाली...

जेनेलिया देशमुखचा आवडता मराठमोळा पदार्थ कोणता? म्हणाली...

बॉलिवूडमधील मोस्ट रोमँटिक आणि मराठमोळं कपल म्हणजे जेनेलिया आणि रितेश देशमुख. या दोघांना महाराष्ट्राचं फेव्हरेट कपल म्हटलं जातं. जेनेलिया डिसुझाने रितेश देशमुखसह लग्न केले आणि संपूर्ण महाराष्ट्रीयन संस्कृतीदेखील आपलीशी केली. संपूर्ण महाराष्ट्र रितेश दादा आणि जेनेलिया वहिनी अशीच साद घालते. महाराष्ट्राची सून असलेली जेनेलिया मराठी खूप छान बोलते. याशिवाय तिला मराठी संस्कृतीची जाणदेखील आहे. तिला मराठी पद्धतीने जेवण बनवताही येतं. जेनेलियाला महाराष्ट्रीय पदार्थ खायलाही खूप आवडतात.

जेनेलियानं 'कर्ली टेल्स' या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत तिचा आवडता पदार्थ सांगितला आहे. ती म्हणाली, 'मला चटर-बटर खायला फार आवडतं. जेवताना ज्याला आम्ही महाराष्ट्रीयन ताट म्हणतो. त्याच असणारा जवस आणि ठेचा मला प्रंचड आवडतो'. यासोबतच महाराष्ट्रीयन पदार्थ आरोग्यासाठी अतिशय चांगले असून मी अनुभवलं असल्याचंही तिने सांगितलं.

रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख सोशल मीडियावर चांगलेच सक्रीय असतात. वेगवेगळे व्हिडीओ आणि फोटो शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. रितेश व जेनेलियाकडे पाहिलं की, त्यांचा अगदी हेवा वाटतो.  लग्नाला इतकी वर्षे उलटून गेली तर त्या दोघांच्या नात्यामधील गोडवा काही कमी झालेला नाही. चाहते रितेश-जेनेलियाच्या आगामी सिनेमांची आतुरतेने वाट पाहत आहेत. 
 

Web Title: Genelia Deshmukh's favorite maharashtrian food

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.