जिनिलिया देशमुखने पारंपारिक पद्धतीने साजरी केली वटपौर्णिमा, फोटो शेअर करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2023 07:08 PM2023-06-03T19:08:14+5:302023-06-03T19:08:52+5:30

जिनिलिया देशमुखने इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या फोटोत ती घरात वडाच्या झाडाच्या फांदीची पूजा करताना दिसत आहे.

Genelia Deshmukh celebrated Vatpurnima in a traditional way, shared a photo and said... | जिनिलिया देशमुखने पारंपारिक पद्धतीने साजरी केली वटपौर्णिमा, फोटो शेअर करत म्हणाली...

जिनिलिया देशमुखने पारंपारिक पद्धतीने साजरी केली वटपौर्णिमा, फोटो शेअर करत म्हणाली...

googlenewsNext

महाराष्ट्राचे लाडके कपल म्हणून अभिनेता रितेश देशमुख (riteish deshmukh) आणि जिनिलिया डिसुझा (Genelia d'souza) यांच्याकडे नेहमीच पाहिले जाते. त्यांच्या वागण्यातून, बोलण्यातून प्रत्येक कृतीमधून त्यांच्यातील संस्कार दिसून येतात. त्यामुळे या जोडीची कायम नेटकऱ्यांमध्ये चर्चा होत असते. विशेष म्हणजे देशमुखांच्या कुटुंबात सून म्हणून आलेली जिनिलिया या कुटुंबात छान सरमिसळून गेली आहे. तिथले सण जिनिलिया मोठ्या उत्साहाने पारंपारिक पद्धतीने साजरी करते. दरम्यान आज वटपौर्णिमादेखील तिने साजरी केली. याचा फोटो तिने इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आहे. तिच्या या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

जिनिलिया देशमुखने इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या फोटोत ती घरात वडाच्या झाडाच्या फांदीची पूजा करताना दिसत आहे. या बॅकग्राउंडला रितेश-जिनिलियाचा चित्रपट वेडमधील सुख कळले हे गाणे वापरण्यात आले आहे. हा फोटो शेअर करत तिने रितेश देशमुखला टॅग करत लिहिले की, वटपौर्णिमा. रितेश देशमुख तू माझ्यासोबत कायम असणार आहे. रितेशने देखील जिनिलियाचा हा फोटो शेअर करत लव्ह यू बायको अशी कमेंट केली आहे. या पोस्टला चाहत्यांची खूप पसंती मिळताना दिसते आहे.

रितेश-जिनिलियाच्या 'वेड'ला मिळालं खूप प्रेम
गेल्या वर्षी रितेश-जेनेलियाचा 'वेड' (Ved) हा पहिला मराठी सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमातून रितेशने दिग्दर्शकीय क्षेत्रात पदार्पण केलं. तर, जेनेलियाने मराठी सिनेसृष्टीत. त्यामुळे या सिनेमाची मोठी चर्चा झाली. इतकंच नाही तर या सिनेमाने अनेक पुरस्कारही पटकावले.

Web Title: Genelia Deshmukh celebrated Vatpurnima in a traditional way, shared a photo and said...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.