गोव्याच्या हॉटेलमध्ये काय करतेय गौरी खान!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2016 17:36 IST2016-12-20T17:07:58+5:302016-12-20T17:36:40+5:30
अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खान सध्या गोव्यात आहे. ख्रिसमसच्या सुट्या किंवा न्यू इअर सेलिब्रेशनचा तिचा बेत असावा असा ...

गोव्याच्या हॉटेलमध्ये काय करतेय गौरी खान!
सेलिब्रेटी मानली जाणारी गौरी खान ही शाहरुख खानची पत्नी असली तरी इंटेरिअर डिझायनर म्हणून तिने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. मुंबईसह अनेक ठिकाणी गौरीने आपल्या इंटेरिअर डिझाईन्सचा नमुना सादर केला आहे. नुकतेच ट्विटरवरून ऋ षी कपूर यांनी रणबीर कपूरच्या नव्या घराचा फोटो शेअर करीत गौरीचे आभार मानले होते. रणबीरच्या नव्या घराचे इंटेरिअर गौरीने केले आहे.
सोशल मीडिया साईट इन्स्टाग्रामवरून फोटो शेअर करताना गौरीने या फोटोवर ‘‘#गौरीखानडिझाईन्स # हॉटेल सुईट # गोवा’’ अशी कॅप्शन दिली आहे.
फोटोमध्ये डिझाईन केलेल्या रूममध्ये ती बसलेली दिसत आहे. यासोबतच गौरीच्या इन्स्टाग्रामवर तिच्या डिझाईन्सचे काही नमुने आपणास पाहता येतात.
काही दिवसांपूर्वी गौरी ही आपल्या इंटेरिअर डिझाईन स्टुडिओसाठी मुंबईत जागा शोधत असल्याची बातमी आली होती. या बातमीनुसार गौरी खानचा फोटो एक पापाराझीने क्लिक केला होता. हा फोटो डिलीट करण्याची विनंती गौरीने केली होती अशी ती बातमी होती. यामुळे लवकर गौरी आपला इंटेरिअर डिझाईन ब्रँड घेऊन येणार असल्याचा अंदाज लावला जात आहे. सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असलेली गौरी ही बातमी लवकरच आपल्याला देईल अशी आशा करूया.