Gangubai Kathiawadi Trailer : आलियाच्या 'गंगूबाई काठियावाडी'चा धमाकेदार ट्रेलर रिलीज, एकदा बघाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 13:08 IST2022-02-04T13:07:27+5:302022-02-04T13:08:20+5:30
Gangubai Kathiawadi Trailer : आलिया भट्टच्या या सिनेमाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत. ती अपेक्षा पूर्ण होणार असं चित्र ट्रेलरमधून तरी दिसत आहे.

Gangubai Kathiawadi Trailer : आलियाच्या 'गंगूबाई काठियावाडी'चा धमाकेदार ट्रेलर रिलीज, एकदा बघाच
अखेर आलिया भट्टच्या (Alia Bhatt) 'गंगूबाई काठियावाडी' चा जबरदस्त ट्रेलर (Gangubai Kathiawadi Trailer) समोर आला आहे. बऱ्याच दिवसांपासून संजय लीला भन्साळी यांच्या या सिनमाची प्रतिक्षा फॅन्स करत होते. आता या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. 'गंगूबाई काठियावाडी' बाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. आता ट्रेलरही प्रेक्षकांना पसंत पडला आहे.
आलिया भट्टच्या या सिनेमाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत. ती अपेक्षा पूर्ण होणार असं चित्र ट्रेलरमधून तरी दिसत आहे. ट्रेलरमध्ये एक सामान्य मुलगी रेड लाइट एरियाची क्वीन कशी बनते हे दाखवलं आहे. आलियाचं असं रूप पहिल्यांदाच बघायला मिळत आहे.
ट्रेलरमधून आलिया भट्टचा जबरदस्त अवतार बघता येतो. ट्रेलरवरून दिसून येतं की, आलिया भट्ट मोठ्या पडद्यावर धमाका करणार आहे. हा सिनेमा तिच्या करिअरच्या दृष्टीनेही महत्वाचा ठरणार आहे. या ट्रेलरमधून विजय राज याच्या भूमिकेनेही लक्ष वेधलं आहे. तसेच अजय देवगनची भूमिकाही भारी दिसत आहे.
संजय लीला भन्साळीच्या या सिनेमात एका तरूणीची कहाणी आहे. ती माफिया डॉन आणि वेश्यालयाची मालक बनते. आलिया भट्टसोबत यात टीव्ही अभिनेता शांतनु माहेश्वरी दिसणार आहे. तसेच विजय राज, अजय देवगन, सीमा पाहवा, जिम सराभ यांच्याही भूमिका आहे. २५ फ्रेब्रुवारी २०२२ ला हा सिनेमा रिलीज होणार आहे.