‘गदर’ जोडी पुन्हा एकदा!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2016 21:09 IST2016-04-15T15:37:56+5:302016-04-15T21:09:19+5:30
तब्बल १५ वर्षांनंतर अमीषा पटेल आणि सनी देओल ही जोडी पुन्हा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. १४ वर्षांपूर्वी अमीषा व ...

‘गदर’ जोडी पुन्हा एकदा!!
त ्बल १५ वर्षांनंतर अमीषा पटेल आणि सनी देओल ही जोडी पुन्हा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. १४ वर्षांपूर्वी अमीषा व सनीचा ‘गदर: एक प्रेमकथा’ हा चित्रपट आला होता. देशभरातील चित्रपटगृहात या चित्रपटाने ‘गदर’ निर्माण केला होता. या चित्रपटाने लोकप्रीय झालेली अमीषा व सनीची जोडी पुन्हा एकदा येत आहे. होय, अमीषा व सनी लवकरच ‘भैय्याजी सुपरहिट’मध्ये दिसणार आहेत. या चित्रपटाचे अर्धे शूटींगही पूर्ण झाले आहे. लोकांना आमच्या जोडीची प्रतीक्षा आहे, त्यामुळेच आम्ही पुन्हा एकदा आम्ही येत आहोत, असे अमीषा म्हणाली. अमीषाने ‘कहो ना प्यार हैं’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. यानंतर अमीषाचा ‘गदर’ही बॉक्स आॅफिसवर हिट झाला होता. ‘भैय्याजी सुपरहिट’द्वारे प्रीति झिंटा ही सुद्धा बॉलिवूडमध्ये वापसी करीत आहे. तेव्हा बघूया, ही जुनी जोडी लोक किती पसंत करतात ते???