'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 20:10 IST2025-05-15T20:10:29+5:302025-05-15T20:10:56+5:30

Vivek Shauq : विवेक शौक याने लोकप्रिय विनोदी कलाकार आणि अभिनेता होता. पण त्याचा शेवट इतका वाईट होईल, असे कोणालाही वाटले नव्हते. वयाच्या अवघ्या ४७ व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला.

gadar movie fame actor vivek shauq tragic death after lyposuction surgery was in coma for 7 days | 'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट

'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट

'गदर' (Gadar Movie) चित्रपटाचं नाव घेतलं की डोळ्यासमोर येतात त्या सनी देओलची तारा सिंग, अमिषा पटेलने साकारलेली सकीना आणि अमरीश पुरी यांच्या अशरफ अली यांची व्यक्तिरेखा. पण आणखी एक व्यक्तिरेखा खूप लोकप्रिय झाली, ज्याची तारा सिंगसोबतची जोडी लोकांना खूप भावली होती. ती व्यक्तिरेखा होती दरम्यान सिंग, जी विवेक शौक (Vivek Shauq) याने साकारली होती. तो एक लोकप्रिय विनोदी कलाकार आणि अभिनेता होता. पण त्याचा शेवट इतका वाईट होईल, असे कोणालाही वाटले नव्हते. वयाच्या अवघ्या ४७ व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला. 

विवेक शौकने त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात नाट्य आणि मालिकेतून केली. दूरदर्शनवरील जसपाल भट्टी यांच्या 'फ्लॉप शो'मध्ये तो झळकला आणि हिट ठरला. त्यानंतर त्याने पंजाबी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. 'गदर' व्यतिरिक्त विवेक शौकने '३६ चायना टाउन', 'ऐतराज', 'हमको दीवाना कर गये' आणि 'दिल है तुम्हारा' यांसारखे अनेक चित्रपट केले.

लिपोसक्शन शस्त्रक्रियेनंतर अभिनेत्याची बिघडली तब्येत

विवेक शौक यांच्या वैयक्तिक आयुष्यात आणि कारकिर्दीत सर्व काही ठीक चालले होते. परंतु त्यांनी वजन कमी करण्याचा आग्रह धरला आणि हा हट्ट त्यांच्यासाठी घातक ठरला. ३ जानेवारी २०११ रोजी विवेकने वजन कमी करण्यासाठी लिपोसक्शन शस्त्रक्रिया केली. ठाण्यातील कारखानीस नर्सिंग होममध्ये त्याने ही शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेनंतर अवघ्या दोन तासांत विवेकची तब्येत बिघडली आणि त्याला ३ हृदयविकाराचे झटके आले, असे सांगितले जाते. त्यानंतर त्याला ताबडतोब ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर डॉ. विजय सुरसे यांनी 'मुंबई मिरर'ला विवेक शौकच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली. त्यांच्या मते, विवेकला तीन वेळा हृदयविकाराच्या झटक्यांनंतर ३ जानेवारी रोजी रुग्णालयात आणण्यात आले होते. त्यांचे हृदय पूर्णपणे काम करणे थांबले होते. 

२००३ मध्ये अभिनेत्याची झालेली अँजिओप्लास्टी
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, विवेक शौकला तीन वेळा इलेक्ट्रिक शॉक देण्यात आले, परंतु तो शुद्धीवर आला नाही. त्यानंतर त्याला लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आले, त्यानंतर तो कोमात गेला. डॉक्टरांनी सांगितले होते की, जेव्हा त्याने विवेक शौकचे वैद्यकीय रिपोर्ट पाहिले तेव्हा तो हार्ट पेशंट असल्याचे आढळून आले. २००३ मध्ये त्याची अँजिओप्लास्टी झाली होती. त्याच्या हृदयात तीन स्टेंट टाकण्यात आले होते. तो रक्त पातळ करणारी औषधे घेत होता, परंतु लिपोसक्शन शस्त्रक्रियेपूर्वी त्याने ही औषधे घेणे बंद केले होते.

अभिनेत्याने घेतला जगाचा निरोप

त्याचवेळी, विवेक शौकची शस्त्रक्रिया करणारे डॉ. समीर कारखानी यांनी सांगितले होते की, अभिनेत्याने त्यांना शस्त्रक्रियेपूर्वी त्याच्या रक्त पातळ करणाऱ्या औषधांबद्दल आणि अँजिओप्लास्टीबद्दल काहीही सांगितले नव्हते. जेव्हा त्याचा ईसीजी आणि २डी इको करण्यात आला तेव्हा तो सामान्य होता. परंतु शस्त्रक्रियेनंतर अवघ्या दोन तासांत विवेकची प्रकृती गंभीर झाली. तो कोमात गेला. आणि त्यानंतर सात दिवसांनी त्याचा मृत्यू झाला. अभिनेत्याच्या पश्चात त्याची पत्नी सरबजीत, दोन मुली आणि एक मुलगा आहे- सादिका, मुदिता आणि सुनीस्ट. मुलगी मुदिता ही एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. ती तिच्या बहिणी आणि आईसह एलआयसीमध्ये विमा एजेंट म्हणून देखील काम करत असल्याचे समजते आहे.

Web Title: gadar movie fame actor vivek shauq tragic death after lyposuction surgery was in coma for 7 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.