'गदर' फेम अमिषा पटेल 'या' अभिनेत्याला मानते तिचा नवरा, नाव ऐकून तुम्हीही व्हाल चकीत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 12:24 PM2024-02-22T12:24:25+5:302024-02-22T12:25:38+5:30

अमिषा पटेलने एका सुप्रसिद्ध अभिनेत्याला तिचा नवरा म्हणून स्वीकारले आहे. कोण आहे तो?

gadar fame Amisha Patel considers actor tom cruise actor as her husband? | 'गदर' फेम अमिषा पटेल 'या' अभिनेत्याला मानते तिचा नवरा, नाव ऐकून तुम्हीही व्हाल चकीत

'गदर' फेम अमिषा पटेल 'या' अभिनेत्याला मानते तिचा नवरा, नाव ऐकून तुम्हीही व्हाल चकीत

'गदर' (Gadar) मधली सकीना सगळ्यांच्या आवडीची. सकीनाची भूमिका साकरलीय अभिनेत्री अमिषा पटेल (Amisha Patel) हिने. अमिषाने चाळीशी ओलांडली असली तरीही तिचं सौंदर्य अनेकांना भूरळ पाडणारं आहे. २०२३ मध्ये आलेला 'गदर 2' (Gadar 2) सिनेमा बॉक्स ऑफीसवर चांगलाच सुपरहिट झाला. सिनेमाने अनपेक्षितपणे ५०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली. अमिषाच्या अभिनयाचं खुप कौतुक झालं. तुम्हाला माहितीय का, अमिषाने एका सुप्रसिद्ध अभिनेत्याला मनोमन पती मानलंय. कोण आहे तो?

वास्तविक, अलीकडेच अभिनेत्री अमिषा पटेलने फिल्मीग्यानशी संवाद साधला. ज्यामध्ये तिने तिची कारकीर्द, देओल कुटुंबाशी असलेलं तिचं नातं आणि तिच्या प्रेमाविषयी सांगितलं. अमिषाने सांगितले की, "मी खऱ्या आयुष्यात लग्न केलं नसलं तरी मी एका व्यक्तीच्या प्रेमात आहे. आणि त्याला मी माझा पती म्हणून स्वीकारले आहे. तो म्हणजे हॉलिवूडचा अभिनेता टॉम क्रूझ."

अमिषा पुढे म्हणाली, तिला हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूझ खूप आवडतो. आणि त्याच्यावर ती अक्षरशः जीव ओवाळून टाकते. तिचे आयुष्य त्याच्यासाठी समर्पित आहे. याशिवाय तिच्या हृदयात तिने मनोमन टॉमला तिचा नवरा म्हणून स्वीकारले आहे, असाही खुलासा अमिषाने केला. अमिषाच्या या विधानाची सध्या सगळीकडे चर्चा आहे. अमिषा सध्या कोणत्याही नवीन प्रोजेक्टवर काम करत नाहीय 

Web Title: gadar fame Amisha Patel considers actor tom cruise actor as her husband?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.