अमिषा पटेलचा भाऊ अश्मित आता काय करतो, अनेकदा सापडलाय वादात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 12:27 PM2023-03-21T12:27:06+5:302023-03-21T12:32:31+5:30

'बिग बॉस 4' चा सीझन आठवतोय का? या शोमधील दोन स्पर्धक अश्मित पटेल आणि वीणा मलिक प्रसिद्ध झाले होते. अमिषा पटेलचा भाऊ अश्मित कुठे आहे आणि आजकाल काय करतोय, जाणून घेऊया..

Gadar actress ameesha patel brother ashmit flop career mostly associated with controversies | अमिषा पटेलचा भाऊ अश्मित आता काय करतो, अनेकदा सापडलाय वादात

अमिषा पटेलचा भाऊ अश्मित आता काय करतो, अनेकदा सापडलाय वादात

googlenewsNext

सध्या चित्रपट वर्तुळात 'गदर 2'(Gadar 2) ची जोरदार चर्चा आहे. सनी देओल(Sunny Deol)च्या ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या दुसऱ्या भागावर काम सुरू आहे. या चित्रपटात सनीसोबत अमिषा पटेल  (Ameesha Patel) पुन्हा एकदा दिसणार आहे. अमिषाला इंडस्ट्रीत सुरुवातीला जी प्रसिद्धी मिळाली, ती फार काळ टिकू शकली नाही. अमिषाच्या पाऊलावर पाऊल टाकत तिच्या भावानेही सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. बहिणीप्रमाणेच अश्मित पटेलही  फारशी प्रसिद्धी मिळवू शकला नाही. वादांच्या भोवऱ्यात अडकलेला अश्मित कुठे आहे आणि सध्या काय करतोय? चला, जाणून घेऊया...

अश्मित पटेलचा जन्म 13 जानेवारी 1978 रोजी दिल्लीत झाला. मुंबईतून शालेय शिक्षण घेतल्यानंतर अश्मितने अमेरिकेतून बिझनेसमध्ये पदवी घेतली आहे. सुरुवातीच्या काळात अश्मितची ओळख फक्त अमिषा पटेलचा भाऊ अशीच होती. 2003 मध्ये 'इंताहा' या चित्रपटातून अश्मितने आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. अश्मितने छोट्या ते मोठ्या पडद्यावर अभिनय केला पण तो वादांमुळे चर्चेत राहिला.

अश्मित पहिल्यांदा  2010 मध्ये रिअॅलिटी शो 'बिग बॉस 4' मध्ये दिसला होता. यादरम्यान त्याचे नाव पाकिस्तानी ड्रामा क्वीन वीणा मलिकसोबत जोडले गेले. या सीझनमध्ये त्यांच्या नात्याच्या चर्चा रंगल्या होत्या. वीणा मलिकच्या अश्मितबद्दल अशी अनेक विधाने केली गेली जी चर्चेचा विषय ठरली. यानंतर रिया सेनचा एमएमएस लीक झाला, ज्यामध्ये अश्मितही होता. या  एमएमएस लीक प्रकरणानंतर दोघांचेही नाव चांगलेच चर्चेत आले होते, मात्र दोन्ही कलाकारांनी हा एमएमएस फेक असल्याचे सांगितले. त्याचवेळी अश्मितचे नाव मेहक चहलसोबतही जोडले गेले. दोघेही बरेच दिवस रिलेशनशिपमध्ये होते आणि एंगेजमेंटही झाले होते, पण काही काळानंतर दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला.

सध्या अश्मित त्याच आयुष्य एन्जॉय करतो आहे आणि अनेकदा प्रवासाशी संबंधित व्हिडिओ शूट करतो. याशिवाय तो छोट्या- मोठ्या भूमिकाही साकारत असतो.  2021 मध्ये तो दोन वेब सीरिजमध्येही दिसला होता. यासोबतच तो म्युझिक व्हिडिओ आणि इव्हेंटमध्येही स्पॉट झाला होता. 
 

Web Title: Gadar actress ameesha patel brother ashmit flop career mostly associated with controversies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.