कॉमेडीचा डबल डोस! 'फुक्रे'ची जोडी 'राहु केतू'च्या माध्यमातून पुन्हा हसवायला तयार, टीझर रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 16:29 IST2025-11-20T16:24:02+5:302025-11-20T16:29:35+5:30
अनोखं कथानक असलेल्या राहु केतू सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. हा टीझर पाहून तुम्ही खळखळून हसाल

कॉमेडीचा डबल डोस! 'फुक्रे'ची जोडी 'राहु केतू'च्या माध्यमातून पुन्हा हसवायला तयार, टीझर रिलीज
विनोदी भूमिकांनी प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणारी अभिनेता पुलकित सम्राट (Pulkit Samrat) आणि वरुण शर्मा (Varun Sharma) यांची जोडी पुन्हा एकदा एकत्र आली आहे. 'फुक्रे' चित्रपटानंतर आता ही जोडी लवकरच 'राहू केतू' या नवीन चित्रपटातून पडद्यावर धमाल करणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे.
टीझरमध्ये काय आहे खास?
'राहू केतू'च्या टीझरमध्ये चित्रपटाच्या कथेची एक झलक पाहायला मिळते. ज्यात कॉमेडीचा 'डबल डोस' प्रेक्षकांना आकर्षित करत आहे. या चित्रपटात पुलकित आणि वरुण पुन्हा एकदा त्यांच्या विनोदी शैलीत प्रेक्षकांना खळखळून हसवताना दिसत आहेत.
या टीझरमध्ये एक विशेष चेहरा पाहायला मिळाला, तो म्हणजे गंभीर भूमिकांसाठी ओळखले जाणारे अभिनेते अमित सियाल. अमित सियाल यांची एन्ट्री टीझरमध्ये लक्ष वेधून घेणारी आहे. 'मिर्झापूर', 'महारानी' आणि 'जमतारा' यांसारख्या वेबसीरिजमध्ये गंभीर आणि प्रभावी भूमिका साकारणारे अमित सियाल पहिल्यांदाच अशा कॉमेडी जॉनरमध्ये दिसत आहेत.
'फुक्रे'मध्ये 'चुचा' आणि 'हनी' या भूमिकांनी वरुण शर्मा आणि पुलकित सम्राट यांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले होते. आता 'राहू केतू'मध्ये ही जोडी काय नवीन घेऊन येते, याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.
टीझरवरून हा चित्रपट कॉमेडीने परिपूर्ण असेल, यात शंका नाही. वरुण शर्मा आणि पुलकित सम्राट हे कॉमेडीचे बादशाह अमित सियालसोबत विनोदाची नवीन जुगलबंदी कशी करतात, हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून, टीझर रिलीज झाल्यामुळे चित्रपटाबद्दलची चर्चा अधिक वाढली आहे. 'राहू केतू'च्या माध्यमातून ही 'तिकडी' प्रेक्षकांचे किती मनोरंजन करते, हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच स्पष्ट होईल.