'Fukrey 2' Confirmed! 8 डिसेंबरला रसिकांच्या भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2017 11:02 IST2017-03-18T05:32:47+5:302017-03-18T11:02:47+5:30
रसिकांची प्रतिक्षा संपली आहे कारण 2013 साली गाजलेल्या 'फुकरे' या सिनेमाचा सिक्वेल म्हणजेच 'फुकरे' रिर्टन्सच्या रिलीजची तारीख समोर आली ...

'Fukrey 2' Confirmed! 8 डिसेंबरला रसिकांच्या भेटीला
र िकांची प्रतिक्षा संपली आहे कारण 2013 साली गाजलेल्या 'फुकरे' या सिनेमाचा सिक्वेल म्हणजेच 'फुकरे' रिर्टन्सच्या रिलीजची तारीख समोर आली आहे. जुगाडू बॉईसची धम्माल फुकरे रिटर्न्स या सिक्वेलमधून रसिकांना अनुभवता येणार आहे. एक्सेल इंटरटेन्मेंटने या बहुप्रतिक्षित सिनेमाचं पहिलं टीझर पोस्टर लॉन्च केलंय. सोबतच या सिनेमाच्या रिलीजची तारीखही या पोस्टरच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली आहे. 8 डिसेंबरला फुकरे रिटर्न्स रसिकांच्या भेटीला येणार आहे. जुगाडू बॉईस पुन्हा एकदा परत येत आहेत.तुमच्या जीवनात फुकरापंती आणण्यासाठी जुगाडू बॉईस सज्ज झाले आहे. याबाबत ट्विट निर्माता कंपनीकडून जारी करण्यात आलं. फुकरे रिटर्न्सच्या रिलीजची तारीख जाहीर झाल्याने रसिकांचा उत्साह वाढलाय. सोशल मीडियावरही तरुणाईच्या प्रतिक्रिया ओसंडून वाहत असल्याचे पाहायला मिळतंय. रसिकच नाही तर सिनेमाची स्टारकास्टही यावर ट्विट करुन आपला आनंद व्यक्त करत आहे. अभिनेता पुलकित सम्राट प्रचंड एक्साईटेड असून तसंच ट्विट त्याने केलंय. 8 डिसेंबरला फुकरे रिटर्न्स.. एकमेंकांवर असलेल्या प्रेमामुळेच गँग एकत्र परतत आहे असं ट्विट त्याने केलंय. सध्या हॉलीवुडच्या व्हिक्टोरिया आणि अब्दुल या सिनेमाच्या शुटिंगमध्ये बिझी असलेल्या अली फजलनेही ट्विटच्या माध्यमातून आपल्या फुकरे रिटर्न्सबाबतच्या भावना व्यक्त केल्या आहेत. मृगदिपसिंग लांबाने फुकरे रिटर्न्सचे दिग्दर्शन केलं आहे. तर पुलकित सम्राट, अली फजल यांच्यासोबतच वरुण शर्मा, रिचा चढ्ढा, मनज्योत सिंग, विशाखा सिंग, प्रिया आनंद यांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका असतील. या सिनेमाची निर्मिती एक्सेल इंटरटेन्मेंटची असून फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी हे या सिनेमाचे सहनिर्माता आहेत. मुंबई, दिल्ली आणि दक्षिण आफ्रिकेत फुकरे 2 या सिनेमाचं शुटिग करण्यात आलं आहे.