​‘फुकरे रिटर्न’चे नवे पोस्टर आले...!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2017 13:11 IST2017-08-08T07:41:37+5:302017-08-08T13:11:37+5:30

डिसेंबरमध्ये रिलीज होणाºया ‘फुकरे रिटर्न’चे नवे पोस्टर आज आऊट झाले. फरहान अख्तर आणि त्याचा बिझनेस पार्टनर रितेश सिधवानी निर्मित ...

'Fukira Return' new poster came ... !! | ​‘फुकरे रिटर्न’चे नवे पोस्टर आले...!!

​‘फुकरे रिटर्न’चे नवे पोस्टर आले...!!

सेंबरमध्ये रिलीज होणाºया ‘फुकरे रिटर्न’चे नवे पोस्टर आज आऊट झाले. फरहान अख्तर आणि त्याचा बिझनेस पार्टनर रितेश सिधवानी निर्मित हा चित्रपट २०१३ मध्ये आलेल्या ‘फुकरे’चा सीक्वल आहे.  विशेष म्हणजे, आमिर खान या चित्रपटाशी जुळलेला दिसत आहे. हे पोस्टर बारकाईने पाहिल्यास, आमिर खान प्रॉडक्शनही या चित्रपटाचा भाग आहे, हे दिसते. साहजिकच आमिर खान चित्रपटाशी संबंधित म्हटल्यावर चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखीच वाढणार.



‘फुकरे रिटर्न’ मध्ये पहिल्या चित्रपटाचीच संपूर्ण स्टारकास्ट रिपीट केली गेली आहे. या पोस्टरमध्ये रिचा चड्ढा भोळ्या-भाबळ्या पंजाबी ‘कुडी’च्या रूपात दिसते आहे आणि तिच्यामागे चारही ‘जुगाडू’ (पुलकित सम्राट, अली फजल, मंजोत सिंह, वरूण शर्मा) बसलेले आहेत. त्यांचे हात बांधलेले आहेत आणि ते सर्व  हात जोडून सगळ्यांना माफी मागताना दिसत आहेत. याऊलट भोली अर्थात रिचा चड्ढा या ‘जुगाडूं’समोर आरामात लेटलेली आहे. म्हणजेच, भोलीने या चौघांना पुन्हा एकदा बंदी बनवलेयं, हे पोस्टर पाहिल्यानंतर लक्षात येते. 

मृगदीप सिंह लांबा दिग्दर्शित हा चित्रपट एक विनोदी धम्माल कथा आहे. येत्या ८ डिसेंबरला रिलीज होणाºया या चित्रपटाची टॅगलाईन आधीच्या चित्रपटासारखीच आहे. ‘दुनिया उम्मीद पर नहीं, जुगाड़ पर कायम है’ अशी ही टॅगलाईन आहे. या चित्रपटाचा पहिला भाग प्रचंड लोकप्रीय ठरला होता. आता चित्रपटाचा दुसरा भाग अर्थात ‘फुकरे रिटर्न’ प्रेक्षकांच्या किती पसंतीत पडेल, हे लवकरच दिसेल. तोपर्यंत आपण पोस्टर बघूयात. अर्थात ते बघितल्यानंतर हे पोस्टर कसे वाटले, ते आम्हाला जरूर कळवा.

Web Title: 'Fukira Return' new poster came ... !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.