Friendship Day:कॅटरिना कैफला या नावाने बोलवतो 'भारत' सिनेमाचा दिग्दर्शक अली अब्बास जफर,काहीसा असा आहे त्यांचा 'याराना'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 08:00 IST2018-08-04T12:45:56+5:302018-08-05T08:00:00+5:30
आपल्या आयुष्यात मित्राचं नातं अनोखं असतं...'भारत'च्या निमित्ताने कॅटने आपला मित्र अली अब्बास जफरला साथ दिल्याने पुन्हा त्यांच्यात असलेल्या मैत्रीचे नाते अधोरेखित झाले आहे.

Friendship Day:कॅटरिना कैफला या नावाने बोलवतो 'भारत' सिनेमाचा दिग्दर्शक अली अब्बास जफर,काहीसा असा आहे त्यांचा 'याराना'
कॅट आहे 'गोल्डफिश’ ....वाचून थोडं नवल वाटलं असावं... मात्र गोल्डफिश हे कॅटचं टोपणनाव अर्थात निकनेम आहे.लोलो, बेबो, डुग्गू यासारख्या बी-टाऊनच्या निकनेमप्रमाणे कॅटलाही गोल्डफिश या टोपणनावानं बी-टाऊनमध्ये ओळखलं जातं. आणि हे नाव ठेवले आहे दिग्दर्शक अली अब्बास जफरने.खुद्द कॅटनेच एका मुलाखतीत हे सांगितले आहे.आपल्या आयुष्यात मित्राचं नातं अनोखं असतं... त्यामुळे फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने कॅटने आजपर्यंत कोणालाही माहिती नसलेली या गोष्टीचा उलगडा केला आहे.
होय,कॅट अली अब्बासची चांगली मैत्रीण आहे. म्हणूनच तर जेव्हा प्रियंका चोप्राने साईन केलेला भारत सिनेमातून अचानक काढता पाय घेतला तेव्हा अली अब्बासकडे प्रियंका नंतर दुसरी तिसरी कोणीतीही चॉइस नसून त्याने फक्त आपल्या मैत्रिण कॅटलाच भारतमध्ये संधी दिली.विशेष म्हणजे ऐनवेळी कॅटनेही आपल्या मित्राला साथ दिली.आता प्रियंकाच्या जागी कॅट भारतमध्ये झळकणार आहे. यावरून कॅटने आपल्या मित्राला साथ दिल्यामुळे त्यांच्यात किती चांगली मैत्री आहे हे स्पष्ट होते.
यापूर्वीही दिग्दर्शक अली अब्बास जफर, सलमान आणि कॅटरिना या तिकडीचे सिनेमा रसिकांना पाहिले आहेत.‘मेरे ब्रदर की दुल्हन,‘टाइगर जिंदा है’ अशा सिनेमात कॅटरिना झळकली होती. त्यामुळे पुन्हा एकदा भारतच्या निमित्ताने अली अब्बासच्या सिनेमात कॅटची एंट्री झाली आहे.
एकीकडे कॅट आणि अली यांच्या मैत्रीची चर्चा होत असताना दुसरीकडे मात्र आता प्रियंका चोप्राच्या अव्यवहारीपणाची चर्चा होऊ लागली आहे. प्रियंका आता 'भारत' मध्ये दिसणार नाही याची घोषणा स्वत: दिग्दर्शक अलि जफर यांनी ट्विटरवरून केली. आता प्रियंकाच्या या निर्णयामुळे सलमान खान चांगलाच रागावल्याची चर्चा होत आहे.
सगळंकाही ठरल्यानंतर वेळेवर 'भारत' सिनेमातून अंग काढून घेतल्याने सलमान खान प्रियंकावर चांगलाच चिडला असल्याचं बोललं जात आहे. इतकेच नाही तर त्याला विश्वासही बसत नाहीये की, प्रियंकाने अचानक सिनेमा सोडला. प्रियंकाच्या या निर्णयामुळे सलमान चांगलाच चिडला असून त्याने यापुढे कधीही प्रियंकासोबत काम न करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा बी-टाऊनमध्ये होत आहे. पण असा काही निर्णय घेतल्याची अधिकृत माहिती सलमानकडून मिळाली नाहीये.