मैत्रीवर आधारित बॉलिवूड चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2016 22:23 IST2016-08-07T16:30:14+5:302016-08-07T22:23:05+5:30

बॉलिवूड चित्रपटाची सुरुवातच  ही मित्र व त्यांच्या प्रेमापासून  झालेली आहे. काही अशा गोष्टी आहेत की, ज्या हसवितात, रडवितात व ...

Friendly Bollywood Films | मैत्रीवर आधारित बॉलिवूड चित्रपट

मैत्रीवर आधारित बॉलिवूड चित्रपट


/>
बॉलिवूड चित्रपटाची सुरुवातच  ही मित्र व त्यांच्या प्रेमापासून  झालेली आहे. काही अशा गोष्टी आहेत की, ज्या हसवितात, रडवितात व विचार करायलाही भाग पाडतात. काही असेच मैत्रीवर आधारित हे चित्रपट असून, तुम्हीलाही आपल्या मित्रांसोबत ते वेळोवळी बघण्याची इच्छा होईल. तर  कोणते आहेत, हे मैत्रीवर आधारित चित्रपट त्याच्यावर  एक नजर...

दोस्ती : ‘दोस्ती’हा चित्रपट १९६४ मध्ये प्रदर्शित झाला होता. मैत्रीवर आधारित हा पहिलाच बॉलिवूड चित्रपट आहे. यामध्ये रामू व मोहन हे दोन मित्र असून मैत्रीचे नाते काय असते, हे यामध्ये दाखविण्यात आले आहे.

आनंद : हा  चित्रपटही संपूर्णपणे मैत्रीवर आधारित आहे. एका मित्र  कॅ न्सरचा रुग्ण असतो तर दुसरा त्यांच्यासाठी डॉक्टरकीचे शिक्षण घेऊन, मित्राला वाचविण्यासाठी काम करतो. राजेश खन्ना व अमिताभ बच्चनने या चित्रपटात भूमिका केलेल्या आहेत. १९७१ मध्ये तो प्रदर्शित झाला होता.

शोले : ‘शोले’ हा बॉलिवूडचा आतापर्यंतचा सर्वात आगळा वेगळा राहिलेला चित्रपट आहे. यामधील  ‘ये दोस्ती हम नहीं तोडेंगे’ या गाण्याने मैत्रीला एक वेगळी ओळख करुन दिलेली आहे.

याराना : एक मित्र आपल्या दुसºया मित्राचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्व काही करतो. अशाप्रकारची ‘याराना’ या  चित्रपटाची ही स्टोरी डोळ्यातून पाणी आणणारी आहे. ‘तेरे जैसे यार कहां, कहां ऐसा याराना अशी गाणी त्यामध्ये आहे. १९८१ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

दिल चाहता है : या चित्रपटात आकाश, समीर व सिद्धार्थने यांनी मैत्रीची एक वेगळी ओळख करुन दिली आहे. मैत्रीवर आधारित हा चित्रपट खूप हटके आहे. २००१ मध्ये तो चित्रपट प्रदर्शित झाला होता.

रॉक आॅन :





२००८ मध्ये आलेला ‘रॉक आॅन’ या चित्रपटाची कथा चार मित्र व त्यांच्या संघर्षावर आधारित आहे. हे मित्र अत्यंत हलाखीच्या परिस्थीतीतही एकमेकांची साथ सोडत नाही.

3 इडियट्स : हा चित्रपटही मैत्रीवरच आधारित असून, त्यामध्ये रैंचा, राजू व फरहान हे मित्र दाखविण्यात आले आहेत. कॉलेज लाईफमधील एन्जाय व एकमेकांनासाठी असलेले त्यांचे प्रेम आपल्याला हसविणारे व रडविणारे सुद्धा आहे. २००९ मध्ये आलेल्या या चित्रपटाने  बॉक्स आॅफिसचे सर्वच रेकॉर्ड तोडले होते. असा हा मैत्रीवर आधारित ‘3 इंडियट्स’ चित्रपट आहे.







 

Web Title: Friendly Bollywood Films

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.