​देहविक्री व्यापारावरील चित्रपटात फ्रीडा पिंटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2016 17:55 IST2016-04-15T00:53:53+5:302016-04-14T17:55:49+5:30

देहविक्री व्यापारावर बनणाºया एका चित्रपटाच्या निमित्ताने लवकरच फ्रीडा पिंटो व अभिनेता अनुपम खेर एकत्र येणार आहेत. ‘लव सोनिया’ असे ...

Frieda Pinto in the film on the sex trade trade | ​देहविक्री व्यापारावरील चित्रपटात फ्रीडा पिंटो

​देहविक्री व्यापारावरील चित्रपटात फ्रीडा पिंटो


/>देहविक्री व्यापारावर बनणाºया एका चित्रपटाच्या निमित्ताने लवकरच फ्रीडा पिंटो व अभिनेता अनुपम खेर एकत्र येणार आहेत. ‘लव सोनिया’ असे या चित्रपटाचे नाव आहे. ‘स्लम डॉग मिलिनेयर’चे निर्माते तबरेज नूरानी या चित्रपटासह दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल टाकत आहेत. हा चित्रपट एक भारतीय ग्रामीण तरूणी सोनिया हिच्या धैय व संघर्षाची कथा आहे. सोनिया आंतरराष्ट्रीय देह व्यापाराच्या रॅकेटमध्ये फसते आणि इथून तिचे आयुष्यच बदलून जाते, अशी ही कथा आहे. अनुपम खेर यांनी टिष्ट्वटरवर या चित्रपटाची माहिती दिली. तरबेज नूरानी दिग्दर्शित ‘लव सोनिया’चा भाग असणे गौरवास्पद आहे, असे त्यांनी लिहिले आहे. या चित्रपटात मृणाल ठाकूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अन्य भूमिकांमध्ये अभिनेता पॉल डानो, मनोज वाजपेयी, राजकुमार, रिचा चड्ढा, आदिल हुसैन व सई त्राम्हणकर आदी दिसणार आहे. या चित्रपटाच्या पटकथेसाठी आपण अनेक वर्षे खर्ची घातलेत. हा चित्रपट वादग्रस्त आहे. मात्र देह व्यापाºयाच्या समस्येवर याद्वारे आम्ही प्रकाश टाकू इच्छितो, असे नूरानी म्हणाले.

Web Title: Frieda Pinto in the film on the sex trade trade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.