येत्या वर्षात रंगणार ‘फ्रेश’ जोड्यांचा ‘फ्रेश रोमान्स’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2017 16:14 IST2017-07-10T10:42:16+5:302017-07-10T16:14:19+5:30
अक्षय कुमार व मौनी राय या दोघांचा ‘गोल्ड’ हा सिनेमा येत्या काळात तुम्हाला पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ...

येत्या वर्षात रंगणार ‘फ्रेश’ जोड्यांचा ‘फ्रेश रोमान्स’!
अ ्षय कुमार व मौनी राय या दोघांचा ‘गोल्ड’ हा सिनेमा येत्या काळात तुम्हाला पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अक्षय व मौनी अशी फे्रश जोडी आपल्याला पडद्यावर पाहायला मिळणार आहे. केवळ अक्षय व मौनीचा नाही तर अशा अनेक नव्या ‘फ्रेश जोड्यांचा ‘फ्रेश रोमान्स’ येत्या वर्षांत आपल्याला पाहायला मिळणार आहे. या बॉलिवूडच्या फ्रेश जोड्या कोणत्या ते आपण येथे जाणून घेणार आहोत.
वरूण धवन -अनुष्का शर्मा
![]()
अनुष्का शर्मा व वरूण धवन या दोघांचा आॅनस्क्रीन रोमान्स तुम्हाला लवकरच पाहायला मिळणार आहे. यशराज बॅनरच्या आगामी चित्रपटात अनुष्का व वरूण लीड रोलमध्ये आहे. या चित्रपटाचे नाव आहे, ‘सुई धागा- मेड इन इंडिया’. या चित्रपटाच्या निमित्ताने अनुष्का व वरूणची जोडी प्रथमच एकत्र येते आहे. सरत कटारिया यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिली असून तेच या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. तर मनीष शर्मा या चित्रपटाचे प्रोड्यूसर आहेत. यापूर्वी ‘दम लगाके हईशा’मध्ये मनीष व सरत यांच्या टीमने एकत्र काम केले होते.
आदर जैन- अन्या सिंह
![]()
यशराज बॅनर लवकरच दोन नव्या चेहºयांना लॉन्च करणार आहे. हे दोन चेहरे म्हणजे, अन्या सिंह आणि आदर जैन. आदर जैन म्हणजे, बॉलिवूडचे 'शो मॅन' राज कपूर यांचा नातू. राज कपूर यांची मुलगी रिमा जैन हिचा मुलगा. यशराज बॅनरखाली आदरचे ग्रॅण्ड लॉन्चिंग होत आहे. आदरच्या अपोझिट अन्या सिंह हा नवा कोरा चेहर दिसणार आहे. अन्या ही दिल्लीची राहणारी आहे. आदरच्या अपोझिट हिरोईन शोधण्यासाठी यशराज बॅनर्सने दिल्ली, चंदीगड अशा अनेक शहरात मुलींचा शोध घेतला. अखेर हा शोध अन्या सिंह जवळ येऊन थांबला.
आयुष शर्मा- मौनी राय
![]()
‘रात बाकी’ या चित्रपटातून सलमान खान आयुष शर्माला लॉन्च करणार आहे. आयुष शर्मा म्हणजे सलमानची लाडकी बहीण अर्पिता खान हिचा पती. या चित्रपटात आयुषच्या अपोझिट मौनी रायची वर्णी लागल्याचे कळतेय. म्हणजेच आयुष व मौनी अशी नवी कोरी जोडी या चित्रपटात आपणास दिसणार आहे.
रणबीर कपूर- आलिया भट्ट
![]()
रणबीर कपूर व आलिया भट्ट यांचा आॅनस्क्रीन रोमान्स येत्या काळात आपण पाहू शकणार आहोत. ‘ड्रगन’ या चित्रपटाच्या निमित्ताने रणबीर व आलिया प्रथमच एकत्र येणार आहेत. अयान मुखर्जीच्या या चित्रपटात रणबीरला काही सुपर पॉवर्स मिळाल्याचे दिसणार आहे. म्हणजेच यात तो आगीशी खेळू शकणार आहे. त्यामुळेच या चित्रपटाला ‘ड्रगन’ हे नाव देण्यात आले आहे.
सिद्धार्थ मल्होत्रा -रकुल प्रीत सिंह
![]()
सिद्धार्थ मल्होत्राच्या ‘अय्यारी’ या आगामी चित्रपटात तो रकुल प्रीत सिंहसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. रकुल यापूर्वीही काही बॉलिवूड चित्रपटांत दिसली आहे. पण सिद्धार्थ व ती प्रथमच एकत्र काम करणार आहेत. म्हणजेच सिद्धार्थ व रकुलचा अगदी फ्रेश रोमान्स आपल्याला बघायला मिळणार आहे.
रणबीर कपूर - दीया मिर्झा
![]()
होय, संजय दत्तच्या बायोपिकमध्ये रणबीर कपूर व दीया मिर्झा अशी जोडी तुम्हाला दिसणार आहे. या चित्रपटात दीया संजय दत्तची पत्नी मान्यता दत्तची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच रबणीर व दीया ही जोडी आपण पडद्यावर बघणार आहोत.
रणवीर सिंह -आलिया भट्ट
![]()
‘गल्ली बॉईज’ या चित्रपटात रणवीर सिंह व आलिया भट्ट ही जोडी तुम्हाला दिसणार आहे. ही कथा दोन रॅपर्सच्या खºया आयुष्यावर आधारित आहे. या रॅपर्सनी आपल्या रॅपच्या माध्यमातून मुंबईतील वाढत्या गुन्ह्यांविरोधात आवाज बुलंद केला होता. यानंतर या दोघांनीही समाजसेवेत स्वत:ला वाहून घेतले.
सुशांत राजपूत- सारा अली खान
![]()
सैफ अली खान व अमृता सिंह यांची लेक सारा अली खान ही लवकरच बॉलिवूड डेब्यू करते आहे. अभिषेक कपूरच्या ‘केदारनाथ’ या चित्रपटात तिची व सुशांत सिंह राजपूतची जोडी दिसणार आहे. सुशांत व सारा ही अगदी फ्रेश जोडी प्रेक्षकांना तितकाच फ्रेश फिल देणार आहे.
कार्तिक आर्यन - तापसी पन्नू
![]()
‘प्यार का पंचनामा’ फेम कार्तिक आर्यन आणि ‘पिंक’ फेम तापसी पन्नू ही जोडी ‘चोर निकल के भागा’ या चित्रपटात एकत्र येणार आहे. या चित्रपटात जॉन अब्राहमच्या जागेवर कार्तिकची वर्णी लागली आहे.
टायगर श्रॉफ- अनन्या पांडे
![]()
करण जोहर लवकरच आपल्या ‘स्टुडंट आॅफ द ईअर’चा सीक्वल घेऊन येतोय. जेव्हापासून या चित्रपटाच्या सीक्वलची चर्चा होतेय, तेव्हापासून यात हिरोईन म्हणून कुणाची वर्णी लागेल, याबाबत वेगवेगळे तर्क लढवले जात आहेत. पण आता या चित्रपटात चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे दिसणार आहे ‘स्टुडंट आॅफ द ईअर2’मध्ये टायगर श्रॉफ लीड भूमिकेत आहे. त्यामुळे या चित्रपटात टायगर व अनन्या यांचा आॅनस्क्रीन रोमान्स आपण पाहणार आहोत.