पॉल वॉकरसारखा दिसणार ‘कमांडो2’मधील फ्रेडी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2016 20:45 IST2016-08-17T15:15:55+5:302016-08-17T20:45:55+5:30
अक्षय कुमारच्या ‘हॉलीडे’मधील खलनायक आठवतो?? हो, तोच तो फ्रेडी दारूवाला. ‘हॉलीडे’मधून फ्रेडीने बॉलिवूड डेब्यू केले होते. हाच फ्रिडे आता ...

पॉल वॉकरसारखा दिसणार ‘कमांडो2’मधील फ्रेडी!
अ ्षय कुमारच्या ‘हॉलीडे’मधील खलनायक आठवतो?? हो, तोच तो फ्रेडी दारूवाला. ‘हॉलीडे’मधून फ्रेडीने बॉलिवूड डेब्यू केले होते. हाच फ्रिडे आता तीन वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या ‘कमांडो’ या चित्रपटाच्या सीक्वलमध्ये एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. यात फ्रेडी ग्रे शेड रोलमध्ये आहे. चित्रपटातील स्वत:ची भूमिका ऐकल्यानंतर फ्रेडीला कोण आठवला असेल सांगा बरं?? फ्रेडीला आठवला तो हॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता पॉल वॉकर. ‘कमांडो2’ची स्क्रिप्ट आणि त्यातील स्वत:ची भूमिका जाणून घेतल्यानंतर ‘फास्ट अॅण्ड फ्यूरियस7’मधील पॉल फे्रडीला आठवला. ‘कमांडो2’मधील आपल्या भूमिकेत आणि पॉलच्या भूमिकेत बरेच साम्य असल्याचे फ्रेडीला जाणवले. कदाचित ते खरेही आहे. सूत्रांच्या मते, ‘कमांडो2’मधील फ्रेडीचे लूक ‘फास्ट अॅण्ड फ्यूरियस7’मधील पॉल वॉकरसारखे असणार आहे. या अशा भूमिकेची ‘लॉटरी’ लागणे म्हणजे फ्रेडीचे नशीबच मानायला हवे!
‘फास्ट अॅण्ड फ्यूरियस7’मधील पॉल वॉकर
![]()
फ्रेडी दारूवाला
![]()
‘फास्ट अॅण्ड फ्यूरियस7’मधील पॉल वॉकर
फ्रेडी दारूवाला